सुरगाणा नेटवर्क:सुरगाणा तालुक्यात पावसाने दिलेली उघडीक व त्यामुळे निर्माण झालेली दुष्काळ सदृश्य पद्धती या पार्श्वभूमीवर विविध आदिवासी संघटनांद्वारा सुरगाणा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठीचे निवेदन तहसिलदार सुरगाणा यांना देण्यात आले..
यासोबतच सुरगाणा येथे निर्माण करण्यात आलेल्या विलगिकरण कक्षात निकृष्ट दर्जाचे भोजन पुरवण्याच्या तक्रारी बघता भोजनाचा दर्जा सुधारावा यासाठीचे निवेदन तालुका आरोग्य अधिकारी व तहसीलदार यांना उभासभापती सुरगाणा पंचायत समिती यांच्या उपस्थितीत देण्यात आले, दुष्काळ सदृश्य परिस्थितीची पाहणी करण्याचे निवेदन ही तालुका कृषी अधिकारी सुरगाणा यांना देण्यात आले याप्रसंगी उपसभापती इंद्रजित गावित, नगरसेवक भरत वाघमारे, आदिवासी बचाव, संघर्ष आदिवासी युवा प्रतिष्ठाण, संकल्प आदीयुवा चे एन एस चौधरी, रतन चौधरी, डॉ. हिरामण गावित, दिपक चव्हाण, अशोक भोये, परशराम पाडवी, गणेश वाघमारे, संजय पाडवी,नामदेव पाडवी, हेमंत मोरे, संजय चव्हाण, भागवत धूम, हिरामण चौधरी, हेमंत मोरे, हेमंत महाले, चंदर पवार आदी मान्यवर उपस्थित होते.