Friday, April 26, 2024
HomeNewsमोठी बातमी : उद्याच्या ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीवर सुप्रीम कोर्टाने दिला ‘हा’...

मोठी बातमी : उद्याच्या ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीवर सुप्रीम कोर्टाने दिला ‘हा’ निर्णय

मुंबई : राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी उद्या 30 जून गुरूवारी महाविकास आघाडी सरकारला बहुमतची चाचणी करण्याचे निर्देश दिले आहे. या बहुमत चाचणी विरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात गेली आहे. या याचिकेवर आज सायंकाळी 5 वाजल्यापासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीवर कोणताही स्टे आणलेला नाही. त्यामुळे उद्या बहुमत चाचणी होणार आहे.

शिवसेनेच्या वतीने वकील अभिषेक मनुसिंघवी यांनी बाजू मांडली तर शिंदे गटाकडून वकील कौर यांनी बाजू मांडली. यावेळी शिवसेनेच्या वतीने कोर्टात सांगितले की, अजित पवार आणि छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे, या सोबतच काँग्रेसचे एक आमदार विदेशात आहे, त्यामुळे बहुमत चाचणीला कमी वेळ असल्याने बहुमत चाचणीसाठी वेळ वाढून मिळावा अशी मागणी शिवसेनेचे वकील मनुसिंघवी यांनी कोर्टात केली. मतदानासाठी कोण पात्र आणि कोण अपात्र हे अगोदर ठरविल्यानंतर बहुमत चाचणी घ्यावे असेही शिवसेनेच्या वतीने मनुसिंघवी यांनी मांडले.

कोर्टाने तिन्ही बाजू ऎकल्यानंतर उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीला स्थगिती नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. त्यामुळे उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीला महाविकास आघाडीला सरकारला सामोरे जावे लागणार आहे. या सुनावणी दरम्यान, कोर्ट अपवादात्मक परिस्थितीतच आदेश देऊ शकत असेही देखील कोर्टाने स्पष्ट केले आहे

बहुमत चाचणीला सर्व आमदार हवेत, मात्र आजच आम्हाला बहुमत चाचणीचे पत्र मिळाल्याचे मनुसिंघवी यांनी कोर्टात सांगितले. 10 ते 11 दिवस फ्लोअर टेस्ट पुढे ढकलावे अशी मागणी वकीलांनी शिवसेनेच्या कोर्टात केली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय