Friday, May 3, 2024
HomeNewsसामाजिक ऐक्यासाठी आजही शाहू महाराजांचे विचार प्रेरणादायी - श्रीमंत कोकाटे

सामाजिक ऐक्यासाठी आजही शाहू महाराजांचे विचार प्रेरणादायी – श्रीमंत कोकाटे

नाशिक : लोकराजा राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी समितीतर्फे सोमवारी (ता.२७) श्रीमंत  कोकाटे प्रसिद्ध इतिहास संशोधक यांचे व्याख्यान झाले त्या वेळी ते राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य आणि आजची परिस्थिती या विषयावर बोलत होते.

राजु देसले अध्यक्षस्थानी होते. अॅड नाझीम काजी आणि प्रफुल्ल वाघ यांनी स्वागत केले. समितीचे सचिव जयवंत खताळे प्रभाकर धात्रक, अॅड.प्रकाश काळे, अलका एकबोटे, कुणाल गायकवाड, एस.के.शिंदे, प्रकाश काळे, जयवंत खडताळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बहुजनांच्या शिक्षणासाठी केलेल्या कामातून त्यांचे द्रष्टेपण लक्षात येते. अशाच दूरदृष्टीची आणि उदार राजाची या देशाला आजही गरज आहे, अन्यथा येत्या काळात बहुजन समाजच तर वंचित राहील, असे प्रतिपादन प्रसिद्ध इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी येथे केले.

48 वर्षाचा आयुष्य शाहू महाराज ना लाभले सामाजिक आर्थिक शैक्षणिक सर्वच क्षेत्रामध्ये क्रांती केलेली आहे. 350 राजे होते परंतु त्यांना सर्व विसरले आहे. राजश्री शाहू महाराजांचे वेगवेगळे कायदे आहेत संस्थानाच्या बाहेर जाऊन कार्य केले आहे महाराजांचे कार्य हे मतासाठी आणि स्वार्थासाठी नव्हते. तर सामाजिक ऐक्य, बहुजनांच्या विकासासाठी होते.

फुले आंबेडकर यांच्यावर आरोप केले जातात ते ब्राह्मण दृष्ट्या होते, परंतु त्यांनी ब्राह्मण मुला-मुलींना सुद्धा शिक्षण दिले, फुले शाहू आंबेडकर यांनी कोणत्याही समुदायाचा द्वेष केला नाही. राजश्री शाहू महाराजांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले आज परिस्थिती बघता शालेय शिक्षणावर 2 – 3 टक्के खर्च केला जातो. मात्र शाहू महाराज यांनी 40 टक्के खर्च केला आहे. शाहू महाराज म्हणतात की प्रत्येक समुदायाला शिक्षण मिळाले पाहिजे कोणत्याही समाजाला शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, कोणत्याही व्यक्तीची गुणावरून त्याची बुद्धिमत्ता ठरवता येत नाही असे राजश्री शाहू महाराज यांचे मत होते.

100 वर्ष पूर्वी आरक्षण देण्याची कारण की प्रत्येक वंचित घटकाला शिक्षण मिळाले पाहिजे कोणताही समुदाय शिक्षणापासून वंचित राहता कामा नये त्यांनी त्यांच्या काळात 50 टक्के आरक्षण लागू केले होते.

आजच्या वंचित घटकांना वाचवायचा असेल तर आरक्षण टिकवावे लागेल, संपूर्ण देशात सामाजिक समता व आर्थिक समता आली तर आरक्षण काढून द्यावे असे म्हणाले.

तरुणांनी शाहू महाराज कार्य समजून घेतले पाहिजे. शाहू महाराज हे सामाजिक ऐक्याचे कार्यातून प्रतीक आहे. आज देशातील वातावरण बघता शाहूंच्या विचारांची नितांत गरज निर्माण झाली आहे. असे प्रतिपादन कोकाटे यांनी केले.  

नाशिक जिल्ह्याशी शाहू महाराज यांचा निकटचा संबंध होता. स्वतःच्या संस्थानात नसलेल्या अनेक ठिकाणी शिक्षण साठी त्या काळी मदत केली आहे. नाशिक जिल्ह्यातील उदोजीं मराठा बोर्डिंग, वंजारी बोर्डिंग, शाहू बोर्डिंग ला मदत केली. आज लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ह्या संस्था शाहूंच्या विचार पुढे नेत आहेत. याचा आनंद वाटतो. आज नाशिक जिल्ह्या राजर्षी शाहू महाराज स्मृती समिती वतीने व्ही. एन. नाईक संस्था, व शाहू बोर्डिंग संस्थेचा गौरव करतांना आनंद वेक्त केला.

व्ही.एन.नाईक संस्थेचे  दामोदर मानकर, तानाजी जायभावे, प्रभाकर धात्रक, शाहू बोर्डिंग चे अॅड. प्रकाश काळे, अविनाश आहेर, संगीता तिगोटे, यांनी शाल गुच्छ, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

प्रास्तविक प्रा. एस के शिंदे, पाहुण्यांचा परिचय शिवदास म्हसदे यांनी करून दिला. ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन चे विराज देवांग, तलंहा शेख, प्राजक्त कापडणे, कैवल्य, जयवंत आदींनी क्रांतीगीत सादर केली. या प्रसंगी मा. जिल्हाधिकारी बी. जी. वाघ, सवाना चे प्रा. सुनील कुटे, संजय करंजकर, सोमनाथ मुठाळ, तसेच मान्यवर महादेव खुडे, करूणासागर पगारे, दत्तू तुपे, निशिकांत पगारे, प्रलाद मिस्त्री, कृष्णा चांदगुडे, सागर निकम, रामदास भोंग आदी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय