Monday, March 17, 2025

ब्रेकिंग : उध्दव ठाकरे यांनी दिला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

मुंबई : गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षात आता सर्वात मोठी बातमी येत आहे. अखेर उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंड पुकारल्याने महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले होते. आज झालेल्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी उद्या 30 जून गुरूवारी महाविकास आघाडी सरकारला बहुमतची चाचणी करण्याचे निर्देश दिले आहे. या बहुमत चाचणी विरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात गेली आहे. या बहुमत चाचणीच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबुक वरून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगितले. या सोबतच विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles