Monday, May 6, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडउन्हाळ्यातला गारवा महागणार..आता ऊसाच्या रसावर 12 टक्क्यांचा GST?

उन्हाळ्यातला गारवा महागणार..आता ऊसाच्या रसावर 12 टक्क्यांचा GST?

पुणे : उन्हाळ्यामध्ये आपल्या सर्वांच्याच आवडतं थंड पेय म्हणजे उसाचा रस .मात्र हा उसाचा रस केंद्र आणि राज्य सरकारच्या अर्थविषयक धोरणांमुळे सर्वसामान्यांना जड जाणार की काय असा एकंदरीत प्रश्न निर्माण झाला होता परंतु त्याविषयी अधिक माहिती आपण जाणून घेऊया.

महाराष्ट्र हा देशामध्ये ऊस उत्पादन आणि प्रक्रिया याबाबतीत अग्रेसर आहे .उसाच्या रसापासून साखर गूळ अशी विविध पदार्थ तयार केले जातात. असे जरी असले तरी उन्हाळ्यामध्ये तहान भागवण्यासाठी सर्वसामान्य लोक उसाचा रसाचा शीतपेय म्हणून वापर करतात.

कृषी मालावर प्रक्रिया अंतर्गत उसाच्या रसावर 12 टक्के जीएसटी आकारण्यात यावा असे निवेदन राज्य सरकारच्या वतीने केले आहे मात्र हा जीएसटी रस्त्यावरती उसाचा रस विकणाऱ्या दुकानदारांसाठी लागू नसणार आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय