Friday, May 3, 2024
Homeजिल्हाऊसतोडणी व वाहतूक कामगारांच्या लढ्याला यश - प्रा. डॉ. सुभाष जाधव

ऊसतोडणी व वाहतूक कामगारांच्या लढ्याला यश – प्रा. डॉ. सुभाष जाधव

कोल्हापूर : ऊस तोडणी व वाहतूक कामगारांसाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी कामगार महामंडळ स्थापन झाल्यामुळे २२ वर्षाच्या लढ्याला यश आले असल्याची माहिती सिटु (CITU) प्रणित महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे राज्य सचिव प्रा. सुभाष जाधव यांनी दिली.

पुंगाव ता. राधानगरी जि.कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या ऊस तोडणी कामगारांच्या विभागीय विजयी मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी युवा नेते युवराज पाटील होते.

व्हिडिओ : जहांगीरपुरीमध्ये बुलडोझर रोखताना दिसल्या सीपीएम नेत्या वृंदा करात, देशभर चर्चा..

जिल्हा परिषद, गोंदिया अंतर्गत 80 जागांसाठी पद भरती, 4 ती पास ते पदवीधरांसाठी संधी !

यावेळी काॅ. दिनकर आदमापूरे यांनी ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या साठी गेल्या २२ वर्षात केलेल्या लढयाची व महामंडळाच्या लाभाविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमास पुंगाव, चाफोडी व राशिवडे खुर्द गावातील ऊसतोड कामगार तसेच तंटामुक्तीचे अध्यक्ष अशोक पोवार हेही उपस्थित होते.

मेळावा यशस्वी करण्यासाठी पुंगावचे अध्यक्ष अण्णासो पाटील, सेक्रेटरी रंगराव पाटील, रमेश पाटील, व कमिटी सदस्य, तसेच नाना मोरे, सदाशिव गायकवाड, बळवंत पाटील, एकनाथ गायकवाड, संदीप गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी विकास पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विजयाताई मालुसरे यांचे निधन

10 वी, ITI आणि इंजिनिअरिंग पास विद्यार्थ्यांसाठी संधी ! गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये 264 जागांसाठी भरती


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय