Thursday, May 2, 2024
Homeजुन्नरजुन्नर : मुक्ताई देवी यात्रा उत्सवात पारंपरिक सोंगे सादर करून सामाजिक प्रबोधन

जुन्नर : मुक्ताई देवी यात्रा उत्सवात पारंपरिक सोंगे सादर करून सामाजिक प्रबोधन

जुन्नर : जुन्नरमधील खालचा माळीवाडा येथील मुक्ताई देवीच्या यात्रेनिमित्ताने काढण्यात आलेली सोंगे पारंपरिक यात्रा उत्सवाची आकर्षण ठरली. दिल्ली पासून गल्ली पर्यंतच्या प्रश्नावर विडंबनात्मक, उपरोधिक शैलीने सोंगांच्या माध्यमातून केलेली टीका टिप्पणी, प्रबोधन करण्याची परंपरा या यात्रेच्या निम्मिताने वर्षानुवर्षे चालवीली जात आहे. वाढती महागाई, जुन्नर तालुक्यातील बिबट सफारी प्रकल्प बारामती तालुक्यात नेण्याच्या हालचालीवर शेतकरी व बिबट्याचा वेशभुषेतील कलाकार यांनी शेतकरी व बिबट्या यांचे सहजीवन अधोरेखीत करतानाच बिबट्या सफारी आमची हक्काची नाही कुणाच्या बापाची असा इशारा पण दिला.

सध्या सुरू असलेल्या ईडीच्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर राजकीय टिप्पणी करताना “हमाम मे सब नंगे होते है, दिल्ली पासून गल्ली पर्यंतच्या सर्वपक्षीय नेत्यांची ईडीची चौकशी लावा. ईडीच्या धाडीत महागाई, बेरोजगारी, गरिबी सर्वच गायब अशी टिप्पणी करणारे कलाकार लक्ष वेधत होते. 

जुन्नर : आमदार अतुल बेनके यांच्या अध्यक्षतेखाली रोजगार हमी समितीची बैठक

जुन्नरच्या ग्रामीण भागात बससेवा नव्याने सुरू, ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण

विविध वेशभूषा असलेली पात्रे जनतेसमोर मिरवणुकीच्या माध्यमातून सादर करून समाजात जनजागृती करण्याचे काम खालचा माळीवाडा येथील तरुणांनी केल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे डोक्यावर मंगल कलश घेतलेल्या पारंपरिक वेशातील महिला मुक्ताई देवीच्या पालखी छबिना मिरवणुकीत मोठ्या प्रमानात सहभागी झाल्या होत्या.  आदी कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले.

यात्रा उत्सव यशस्वीपणे पारपाडण्यासाठी राजेंद्र गाडेकर, साईनाथ डोके मुकेश ताजणे, दत्तात्रय बिडवई, अमोल बनकर, महेश ताजणे, शशिकांत ताजणे, अभिजित शेटे, मुकुंद मेहर, जयेश गाडेकर, संदीप ताजणे, जितेंद्र चौधरी शैलेश बनकर, प्रवीण ताजणे, कांताराम ताजणे, आशिष मेहेर, घनश्याम सुरगुडे, अजित शिंदे, अशोक भगत, गोपीनाथ लोखंडे, मनोज खरपुडे, विनायक लोखंडे, नगरसेविका सुवर्णा बनकर, मुक्ताबाई गाडेकर, आदींनी सहकार्य केले.

10 वी, ITI आणि इंजिनिअरिंग पास विद्यार्थ्यांसाठी संधी ! गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये 264 जागांसाठी भरती

केंद्रीय गुप्तचर विभागात 150 जागांसाठी भरती; 1 लाख पेक्षा जास्त पगाराची नोकरी, आजच करा अर्ज !


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय