Friday, May 3, 2024
Homeजिल्हारस्त्याच्या डांबरीकरणासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

रस्त्याच्या डांबरीकरणासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

मावळ : रस्त्याच्या डांबरीकरणासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ( Marxist Communist party Of India ) वतीने मावळ (Maval) तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी नायब तहसीलदार जयश्री मांडवे यांना निवेदन देण्यात आले.

सुदवडी, जांबवडे या दिड किलोमीटरच्या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे. दरवर्षी पावसाळ्यात येथे गुडघाभर पाणी साचते, रहदारी बंद होते. गेली 8 वर्षे रस्त्याचे डांबरीकरण न झाल्यामुळे येथील नागरिकांना कामावर जाताना येताना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरण लवकर करावे, अशी वारंवार मागणी करूनही लोकप्रतिनिधी, पंचायत, जिल्हा परिषदेचे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.

व्हिडिओ : जहांगीरपुरीमध्ये बुलडोझर थांबवताना दिसल्या सीपीएम नेत्या वृंदा करात, देशभर त्यांचीच चर्चा..

पिंपरी चिंचवड, चाकण, तळवडे इ ठिकाणी कामावर जाणाऱ्या या नोकरदार वर्गाने शहरतील घरे परवडत नाहीत, त्यामुळे गुंठा, दीड गुंठा जागा घेऊन घरे बांधली आहेत. रहिवासी नागरिकांची मागणी धसास लावण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पुणे जिल्हा सचिव कॉम्रेड गणेश दराडे यांचे नेतृत्वाखाली तहसील कार्यालय वडगाव मावळ येथे निदर्शने आणि धरणे आंदोलन करण्यात आले. 

जिल्हा परिषद, गोंदिया अंतर्गत 80 जागांसाठी पद भरती, 4 थी पास ते पदवीधरांसाठी संधी !

निवेदनात म्हटले आहे की, सुदवडी जांबवडे या रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण ही मागणी वारंवार निवेदने देऊन करण्यात आली आहे. दोन हजाराहून जास्त लोकवस्ती असलेल्या सुदवडी गावातून जांबवडे येथे रस्त्याचे डांबरीकरण गेली आठ वर्षे प्रलंबित आहे. याबाबत 2021 मध्ये स्मरणपत्रे दिलेली आहेत. येत्या पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे डांबरीकरण करावे, अन्यथा आंदोलन तीव्र करू, असा इशारा माकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड गणेश दराडे यांनी दिला.

या आंदोलनाचे नेतृत्व जनवादी महिला संघटनेच्या (AIDWA) अपर्णा दराडे, सुधीर कराळे, विठ्ठल कदम, उत्तम कदम, गुलाब पाटील, बाळासाहेब शिंदे, सचिन देसाई, अँड. नाथा शिंगाडे, पावसु कऱ्हे, बाळासाहेब शिंदे, सुधीर कराळे, चंद्रकांत जाधव, सचिन देसाई, सुप्रिया शिंगटे, सुप्रिया जगदाळे, अनिता कऱ्हे, सुरेखा काळे, अंजली धस, भाग्यश्री उडगी, राणी माईंड, वृंदावनिय चाटे, शीतल जाधव, पार्वती जाधव, स्वाती कदम, जनाबाई जाधव ई महिला कार्यकर्त्यांनी तहसीलदार काचेरीवर जोरदार निदर्शने केली.

– क्रांतिकुमार कडुलकर

वीज राष्ट्रीय संपत्ती, मंत्रालायापासून प्रीपेड मीटर बसवण्यास सुरूवात करा – नागरिकांच्या प्रतिक्रिया


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय