Tuesday, May 14, 2024
Homeग्रामीणवांजाळे, नायफड येथील ग्रामस्थ व जनावरांच्या जीवाशी चालेला खेळ थांबवा, ग्रामस्थांची मागणी

वांजाळे, नायफड येथील ग्रामस्थ व जनावरांच्या जीवाशी चालेला खेळ थांबवा, ग्रामस्थांची मागणी

इलेक्ट्रिकसिटी डिपार्टमेंट वर ग्रामस्थांची नाराजी

 

खेड : वांजाळे, नायफड (नाव्हाची वाडी), डेहणे कोरडेवाडी, आव्हाट येथील धोकादायक विद्युत डिपची अवस्थेमुळे ग्रामस्थांनी महावितरणाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

डीपीची आवश्यकता इतकी बिकट आहे, की माणसे, व जनावरांनाही विजेचा शॉक लागण्याची भिती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

या भागातील विजेच्या डीपीचे सुरक्षा कवच राहिलेले नाही. काही ठिकाणी फिऊज तुटले आहेत व तेथे फिऊज म्हणून तारेचा वापर केला जातो. अशी परिस्थिती बदलावी म्हणून प्रशासनाला वेळोवेळी अर्ज करून सुध्दा दखल घेतली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

प्रत्येक गावात हिच परसथिती पाहायाला मिळत आहे. याची दखल कुठे तरी प्रशासनाने घेणे गरजेच आहे. अशी मागणी सरपंच शरद जठार, ग्राम पंचायत सदस्य रोहिदास भाईक   ग्राम पंचायत सदस्य सुनिल मिलखे, कार्यकर्ते दादाभाऊ डामसे यांनी केली आहे.

तसेच प्रशासनाने या विषयावर लवकरात लवकर उपाययोजना करून ग्रामस्थांच्या व जनावरांच्या जीवाशी चालेला हा खेळ थांबवावा असेही म्हटले आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय