Wednesday, January 15, 2025
Homeराष्ट्रीयढगफुटीचा थरारक व्हिडीओ, पर्यटनस्थळी मान्सूनचं रौद्ररुप

ढगफुटीचा थरारक व्हिडीओ, पर्यटनस्थळी मान्सूनचं रौद्ररुप

हिमालय प्रदेश, 12 जुलै : सलग तीन आठवडे पावसानं दडी मारल्यानंतर उत्तर भारतात पुन्हा मान्सूनचं आगमन झालं आहे. मागील दोन तीन दिवसांपासून उत्तर भारतात अनेक ठिकाणी मान्सूननं जोरदार हजेरी लावली आहे. यानंतर आज हिमाचल प्रदेशातील धर्मशाला याठिकाणी मान्सूननं रौद्ररूप धारण केलं आहे. ढगफुटी झाल्यानं धर्मशाला येथील भागसू याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आहे. त्यामुळे वाहनांच आणि घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. 

पर्यटकांची चारचाकी वाहनं देखील पाण्यासोबत वाहून गेली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतं आहे.

हिमाचल प्रदेशातील भागसू हे ठिकाण पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी हजारोंच्या संख्येनं पर्यटक येत असतात. अशात ही ढगफुटी झाल्यानं असंख्य पर्यटक घटनास्थळी अडकून पडले आहेत. ढगफुटीमुळे आलेल्या पुराच्या पाण्यात अनेक पर्यटकांच्या गाड्या वाहून गेल्या आहे. खरंतर ज्याठिकाणी ही ढगफुटी झाली आहे, त्याठिकाणी अरुंद नाला आहे. पण ढगफुटीच्या पाण्यामुळे हा नाला ओसंडून वाहत आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय