Sunday, May 19, 2024
Homeजिल्हा'नफरत छोडो, भारत जोडो' सत्याग्रह - धरणे आंदोलन

‘नफरत छोडो, भारत जोडो’ सत्याग्रह – धरणे आंदोलन

इचलकरंजी : महात्मा गांधी यांच्या हुतात्मा दिनी व भारत जोडो यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने भारतीय राज्यघटनेचे तत्वज्ञान अर्थात सरनाम्यातील मूल्ये प्रामाणिकपणे मानणाऱ्या लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष राजकीय पक्ष व विविध जन संघटनांच्या वतीने ‘नफरत छोडो, भारत जोडो’ सत्याग्रह – धरणे आंदोलन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर करण्यात आले.

महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढा दीर्घ काळ चालला. भारत  स्वतंत्र झाला. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधानाचा मसुदा तयार करण्यात आला. त्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, संघराज्यात एकात्मता आदी तत्त्वांना केंद्रस्थानी ठेवून भारतीय राज्यघटना तयार करण्यात आली.

मात्र, आज त्या विचारापासून फारकत सत्ताधारी राज्यकर्त्यांनी घेतली आहे. अशावेळी राज्यघटनेच्या तत्वांचा पुरस्कार करून देशापुढील खऱ्या व महत्वाच्या प्रश्नांचे जनजागरण करणे हीच राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली ठरेल असे मत या सत्याग्रह धरणे आंदोलनात विविध वक्त्यांनी मांडले. प्रारंभी ज्येष्ठ समाजवादी नेते साथी शामराव नकाते यांच्या शुभहस्ते गांधीजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधींना स्तब्धता पाळून अभिवादन करण्यात आले.

यावेळी दिवसेंदिवस महागाई, बेरोजगारी वाढत आहे. संपत्तीचे केंद्रीकरण केले जात आहे. जनहिताचे व शेतकरी कामगार यांच्या हक्कांचे कायदे संपुष्टात आणले जात आहेत. मुठभर उद्योगपतींच्या हितासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा राबवली जात आहे. देशातील फायद्यात असणाऱ्या देखील सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. आणि या सर्व मुद्द्यावरून जनतेचे लक्ष हटविण्यासाठी देशभरात विद्वेषाचे वातावरण निर्माण केले जात आहे. त्यासाठी समजमध्यामे, चित्रपट, नाट्य व लेखन यांचा जाणीवपूर्वक गैरवापर केला जात आहे. या सर्व प्रवृत्तीच्या विरोधात संघटितरित्या विरोध करण्याकरता धरणे आंदोलन करण्यात आले. नफरत छोडो भारत जोडो बरोबरच महात्मा गांधींच्या सत्य, अहिंसा आदी मूल्यांचा जागर समाज स्वास्थ्यासाठी  करण्याची गरज प्रतिपादन करण्यात आली.

यावेळी सीपीएमचे कॉ. दत्ता माने, कॉ. प्रा. ए. बी. पाटील, कॉ. जीवन कोळी, स्वराज इंडियाचे इस्माईल समडोळे, राजू गांजवे, समाजवादी प्रबोधिनीचे प्रसाद कुलकर्णी, काँग्रेसचे राहुल खंजिरे, बाबासाहेब कोतवाल, शेकापचे भाई शिवाजी साळुंखे, सीपीआयचे कॉ. हनुमंत लोहार, लाल निशाण चे सुनील बारवाडे तसेच किरण माळी, किरण कटके, वकील संघटनेचे एडवोकेट जयंत बलूगुडे यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मिलिंद कोले, गोवर्धन दबडे,विकास चौगुले, सतीश मगदूम, जनता दलाचे पद्माकर तेलसिंगे, गौस अत्तार, जावेद मोमीन, स्वराज इंडियाचे दिलीप जोशी, इलियास समडोळे, सिकंदर मुल्ला, खोकीधारक संघटनेचे रवींद्र नवाळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. सदा मलाबादे यांनी आभार मानले.

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय