मुंबई : जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता, अमेरिकेतील मंदीचा धोका, मध्य पूर्वेतील तणावामुळे आज सोमवारी सकाळी शेअर बाजारात मोठी पडझड स्मॉलकॅप आणि मिडकॅप समभागांनी देखील तीव्र घट अनुभवली, बेंचमार्क स्टॉक मार्केट निर्देशांकांनी जोरदार घसरण केली. (Stock market)
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मंदीचा धोका आणि मध्य पूर्वेतील इस्रायल आणि इराण यांच्यातील धोकादायक तणावामुळे उद्भवलेल्या कमजोर जागतिक संकेतांचा परिणाम भारतात होत आहे.
मुंबई शेअर बाजार 1672.88 अंकांनी घसरून सकाळी 9:15 वाजता 79,309.07 वर होता, तर एनएसई निफ्टी 50 414.85 अंकांनी घसरून 24,302.85 वर उलाढाल करत होता.
शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्सची तब्बल 2400 अंकांहून मोठी घसरण झाली आहे. तर दुसरीकडे निफ्टीही 500 अंकांनी घसरला आहे. यामुळे सोमवारी शेअर बाजार सुरु होताच या एकूण परिस्थितीत गुंतवणूकदारांचे 10 लाख 22 हजार कोटींचे नुकसान झाले आहे.
टाटा मोटर्स शेअर ४.२८ टक्के, टाटा स्टील शेअर ३.८९ टक्के, मारुती मोटर्स शेअर ३.१९ टक्के, अदानी पोर्ट ३.२६ टक्के , जेएडब्लू स्टील ३.२१ टक्के, एसबीआय ३.१९ टक्के, एल अँड टी ३ टक्के आणि रिलायन्स शेअर २.२७ टक्क्यांनी घसरला. (Stock market)
Stock market
एसअँडपी बीएसई सेंसेक्स 1672.88 अंकांनी घसरून सकाळी 9:15 वाजता 79,309.07 वर होता, तर एनएसई निफ्टी50 414.85 अंकांनी घसरून 24,302.85 वर व्यापार करत होता. इतर बहुतेक विस्तृत बाजार निर्देशांक देखील नकारात्मक क्षेत्रात व्यापार करत होते, ज्यात स्मॉलकॅप आणि मिडकॅप समभाग निर्देशांकांइतकेच घसरले होते.
म्हणजे शेअर मार्केट मधील प्रमुख लिष्टेड कंपन्यांचे शेअर कोसळले आहे, हा संपूर्ण जागतिक अर्थकारण, युद्धजन्य परिस्थितीचा जगभर परिणाम सर्वत्र आहे, असे शेअर बाजार मधील तज्ञांचे मत आहे.
हेही वाचा :
मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास
नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलचे पश्चिम घाटाच्या इको-संवेदनशील क्षेत्राबाबत मंत्रालयाला निर्देश
सरन्यायाधीशांची नातवंडे सर्वोच्च न्यायालयात विराजमान झाल्यावर आम्हाला न्याय मिळेल; सामनातून टीका
मोठी बातमी : पुण्यात मुसळधार पाऊस सुरू, प्रशासनाच्या मदतीसाठी भारतीय लष्कर दाखल
ब्रेकिंग : खेळाडूंसाठी BCCI ने केली मोठी घोषणा
निशांत देवची निराशा, ऑलिम्पिकमध्ये पदकाची संधी हुकली
राज्यात मुसळधार पाऊसाचा इशारा, तर काही जिल्ह्यांना रेड अलर्ट
कोलकाता विमानतळ बनले तलाव; बंगाल मध्ये तुफान पाऊस, व्हिडिओ व्हायरल