Monday, May 20, 2024
Homeग्रामीणमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विविध मागण्यांसाठी तहसिलदारांना निवेदन.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विविध मागण्यांसाठी तहसिलदारांना निवेदन.

शहादा (प्रतिनिधी) : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विविध मागण्यांना घेऊन आज प्रभारी तहसीलदार उल्हास देवरे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे, की कोरोनो महामारीचा काळात केंद्र सरकारने घेतलेल्या जनविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी व सामान्य जनतेच्या ज्वलंत मागण्यासाठी आज माकपच्या वतीने देशभरात निषेध करण्यात येत आहे.

आयकर नसलेल्या सर्व कुटुंबांंना पुढील सहा महिने दरमहा ७५०० रुपये रुपये अनुदान मिळावे,  माणसी १० किलो मोफत धान्य मिळावे, मनरेगा योजनेतून  २०० दिवस काम व ६०० रुपये मजुरी ग्रामीण व शहरी श्रमिकांना मिळावी, सार्वजनिक उद्योगांंचे खाजगीकरण रद्द करास परदेशी व देशी मक्तेदारांना  सवलती बंद करा, या मागण्या यावेळी करण्यात आल्या.

निवेदन देताना माकपाचे जिल्हा सेक्रेटरी नथूभाऊ साळवे, शहादा तालुका सेक्रेटरी सुनीलभाऊ गायकवाड, सतिलाल महिरे, राजाराम ठाकरे, संतोष गायकवाड, किशोर जाधव, गौतम अहिरे, मिराबाई निकम, सिध्दार्थ गायकवाड, दीपक मोहिते उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय