Saturday, May 18, 2024
Homeग्रामीणभूमिहीन आदिवासींना जमीन द्यावी - बिरसा फायटर्स ची मागणी

भूमिहीन आदिवासींना जमीन द्यावी – बिरसा फायटर्स ची मागणी

रत्नागिरी : भूमीहीन आदिवासी कातकरी बांधवांना जमीन मिळावी, अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी दापोलीचे तहसीलदार वैशाली पाटील यांच्या कडे एका निवेद्नाद्वारे केली आहे. 

                 

निवेदनात म्हटले आहे की,  स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्षांपासून  दापोली तालुक्यातील आदिवासी बांधव अजूनही भूमीहीन आहेत. त्यांना स्वतःच्या मालकीची जमीन नाही. दुस-यांच्या जमिनीवर घरे बांधून आदिवासी बांधव आपलं कष्टमय जीवन जगत आहेत.हे सर्व आदिवासी बांधव दापोली तालुक्यात येणा-या गावातील मूळ रहिवासी असूनही त्यांना अजूनही कोणत्याही योजनेतून स्वतःच्या हक्काची जमीन मिळालेली नाही तसेच जमीन खरेदीसाठी कुठलेही अनुदान मिळालेले नाही.  आदिवासी म्हणजे या पृथ्वीवर आदिकाळापासून वास्तव्य करणारा समूह होय अशी व्याख्या आदिवासींच्या बाबतीत केली जाते.आदिवासी समाज हा अतिप्राचीन मूळ भारतीय आहे. तरीही आदिवासी बांधव आपल्या स्वतःच्या मूलभूत  हक्कांपासून अजूनही वंचित आहे.

दापोली तालुक्यातील कुडावळे आदिवासी वाडी, वेळवी, वेळवी कलानगर, कांगवाई, पाचवली, वळवली, विरसई, भोंमडी, मानवी, पिसई, कादिवली, आवाशी, जामगे इत्यादी गावातील लोकांना स्वतःच्या मालकीची जमीन नाही. त्यांना जमीनीबाबतच्या शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून त्यांनी आपल्या कडे भूमीहीन दाखले मिळावेत, म्हणून सेतू कार्यालयात दिनांक 29/12/2021 रोजी अर्ज केलेले आहेत. म्हणून शासनाच्या विविध योजनेतून भूमीहीन आदिवासी कातकरी बांधवांना जमीन मिळण्यासाठी आपल्या स्तरावर कार्यवाही करण्यात यावी. आदिवासी बांधवांना स्वतःच्या मालकीची जमीन घेता येईल, यासाठी शासकीय अनुदान देण्यात यावे. शासनाकडून भूमीहीन आदिवासी बांधवांना ज्या  शासकीय योजनांचा लाभ दिला जातो, अशा योजनांचा लाभ आदिवासी बांधवांना देण्यात यावेत. तरी भूमीहीन आदिवासी बांधवांना जमीन देण्यात यावी व स्वतःच्या मालकीची जमीन दप्तरी नोंद नसलेल्यांना नोंद करून मिळावी. अशी मागणी बिरसा फायटर्स ने केली आहे. 

यावेळी तहसिल कार्यालयात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शांताराम जाधव, पंचायत समिती सदस्य काळूराम वाघमारे, सुशिलकुमार पावरा सह 10 ते 12 गावातील आदिवासी बांधव उपस्थित होते.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय