Saturday, May 4, 2024
Homeजिल्हाबांधकाम कामगारांचे भर पावसात सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन

बांधकाम कामगारांचे भर पावसात सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन

सातारा : आज २ डिसेंबर २०२१ रोजी सातारा जिल्हा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेच्या वतीने सहायक कामगार आयुक्त सातारा कार्यालयासमोर भर पावसात धरणे आंदोलन करण्यात आले.

२०१९ पासून २०२१ पर्यंतची रखडलेली नवीन नोंदणी फॉर्म त्वरीत मंजूर करा, विविध लाभाचे फार्म त्वरीत मंजूर करा या मागणीसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले होते.

यावेळी  सहायक कामगार अधिकारी भिसले यांचेशी चर्चा झाली त्यात त्यांनी इंजिनिअर प्रमाण पत्रासह इतर त्रुटी दूर करून कामगारांची रखडलेली नवीन नोंदणी करू देण्याचे मान्य केले. तसेच २ वर्षे रखडलेली नोंदणी करण्याची मागणी मान्य केली.

या आंदोलनात माणिक अवघडे, आनंदी अवघडे, संतोष पैठणकर, संतोष नलावडे, विठ्ठल भोसले, संतोष घागरे, विवेक सुतार, प्रकाश नलावडे, रेखा कांबळे, आनंदराव कुंभार, शिवाजी कराडे, दशरथ बुधावले, दत्तात्रय सकट, पंकज उबाळे, पांडुरंग देशमुख आदीसह सहभागी झाले होते.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय