Monday, July 15, 2024
Homeजिल्हादलित पँथर संघटनेचे पुणे विद्यापीठ कुलगुरूंसोबत विविध विषयांवर सकारात्मक चर्चा !

दलित पँथर संघटनेचे पुणे विद्यापीठ कुलगुरूंसोबत विविध विषयांवर सकारात्मक चर्चा !

पुणे / डॉ. कुंडलिक पारधी : आज दिनांक १ डिसेंबर २०२१ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितिन करमळकर यांची “दलित पँथर संघटनेचे पुणे शहर कार्याध्यक्ष प्रा. राहुल ससाणे व त्यांचे सहकारी तसेच इतर  संशोधक विद्यार्थ्यांनी भेट घेतली. 

भेटी दरम्यान कुलगुरू यांच्या सोबत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी प्र. कुलगुरू एन. एस . उमराणी देखील उपस्थित होते.  

ज्या पीएच. डी. संशोधक विद्यार्थ्यांचा संशोधन कालावधी संपलेला आहे . अशा विद्यार्थ्यांना त्यांचे संशोधन कार्य करण्यासाठी सहा महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी, विद्यापीठाच्या विभागातील मार्गदर्शकांच्या संख्येत वाढ करावी. बाहेरील संशोधन केंद्रांनी विद्यापीठ नियमानुसार फी घ्यावी. ज्या संशोधन केंद्रांनी जास्त फी आकारली आहे। त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी.अशा  संशोधन  केंद्रांची मान्यता रद्द करण्यात यावी. JRF प्राप्त विद्यार्थ्यांची fellowship प्रकिया पुर्ण न करणाऱ्या किंवा संशोधक विद्यार्थ्यांना योग्य त्या सेवा सुविधा न देणाऱ्या संशोधन  केंद्रांची मान्यता रद्द करण्यात यावी. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी  विद्यापीठ परिसरात बंद असलेले झेरॉक्स सेंटर तात्काळ चालू करण्यात यावे. पीएच. डी. संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्यात यावी. वसतिगृह सुरू करण्यात यावेत. फूड मॉलच्या ठिकाणी स्वच्छतागृह, शुद्ध पाणी, टेबल खुर्ची वाढवणे आदी मागण्या करण्यात आल्या.

यावर कुलगुरू म्हणाले, ज्या पीएच डी विद्यार्थ्यांची मुदत संपत आहे त्यांना थेसिस जमा करण्यासाठी  कसलीही अडचण असणार नाही, मुदत वाढ दिली जाईल. विद्यापीठ विभागाच्या संशोधन केंद्रात मार्गदर्शक वाढवित आहोत, तसेच बाहेरच्या केंद्रावर संशोधन करणारे विद्यार्थी सुद्धा विद्यापीठ परिसरात येऊन संशोधन करू शकतील, त्यांना इथल्या सुविधा उपलब्ध असतील. बाहेरील संशोधन केंद्रातील पीएच डी शुल्क अतिरिक्त घेतल्याचे आढळून आल्यास त्यावर तात्काळ कारवाई करून संशोधन केंद्राची मान्यता रद्द करण्यात येईल. JRF विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणणाऱ्या आणि मानसिक त्रास देणाऱ्या प्राचार्य व इतर घटकांवर कारवाई केली जाईल. कोविड काळ सुरू झाल्यापासून बंद असलेलं झेरॉक्स सेंटर तात्काळ सुरू करण्यात येईल. यावर्षी ज्यांना ज्यांना पीएच डी प्रवेश मिळेल (संशोधन केंद्रासहित) त्यातील १०० विद्यार्थ्यांना JRD अभिछात्रवृत्ती देण्यात येईल. होस्टेल वाटपाच्या दृष्टीने सज्ज ठेवले असून शासन आदेश होताच तात्काळ खोली वाटपाची प्रक्रिया सुरू केली जाईल. नवीन उभारण्यात आलेल्या फूड मॉलच्या ठिकाणी स्वच्छतागृह, टेबल खुर्ची आणि शुद्ध पाणी या गैरसोयी संदर्भात तात्काळ कार्यवाही केली जाईल, असेही म्हणाले.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय