Sunday, December 8, 2024
Homeग्रामीणआशा व गटप्रवर्तकांचे विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील ७ तहसीलदारांना निवेदन

आशा व गटप्रवर्तकांचे विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील ७ तहसीलदारांना निवेदन

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन सिटू संलग्न संघटनेच्या वतीने आशा व गटप्रवर्तकांचे विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील ७ तालुक्यातील तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. 

केंद्र व राज्य सरकारने मागण्यां बाबत पूर्तता न केल्यास भविष्यात मोठे आंदोलन उभे करावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

■ आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्या पुढीलप्रमाणे : 

1. राष्ट्रीय आरोग्य अभियान कायम करा व त्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करा.

2. आशा व गटप्रवर्तक यांना सरकारी आरोग्य कर्मचारी म्हणून कायम करा.

3. आशाना 18000 रू. व गटप्रवर्तकना 21000 रू. किमान मासिक वेतन सुरू करा.

4. आशा व गटप्रवर्तक ना ग्रॅच्युईटी, पेन्शन इत्यादी सामाजिक सुरक्षा सुरू करा.

5. गेल्या वर्षी पासून लागू केलेली आशाना 2000 रुपये व गटप्रवर्तकना 3000 रुपये  मानधन वाढ नियमित द्या.

6. जून 2021 मध्ये जाहीर केलेल्या आशाना 1500 रुपये व गटप्रवर्तकना 1700 रुपये मानधन वाढ निर्णयाचा शासकीय आदेश त्वरित काढून जुलै 2021 पासून देण्यात यावा.

7. शेतकरी विरोधी तीन कायदे त्वरित रद्द करण्यात यावेत.

8. कामगार विरोधी चार संहिता त्वरित रद्द करण्यात याव्यात.

9. विद्यार्थी विरोधी नवीन शैक्षणिक धोरण 2020 रद्द करण्यात यावे.

10. डिझेल, पेट्रोल, स्वयंपाकाचा गॅस व इतर जीवनावश्यक वस्तूंची महागाई त्वरित कमी करावी.

निवेदन देतावळी जिल्हा कमिटी पदाधिकारी अर्चना धुरी, नम्रता वळंजू, सेजल जाधव, रुचिका पवार, प्रियांका तावडे, निलिमा सारंग, सुप्रिया गवस, सुमिता गवस यांनी नेतृत्व केले. 


संबंधित लेख

लोकप्रिय