Tuesday, May 14, 2024
Homeग्रामीणआम आदमी पार्टी ऑटो संघटनेचे मनपा आयुक्तांंना निवेदन.

आम आदमी पार्टी ऑटो संघटनेचे मनपा आयुक्तांंना निवेदन.

नागपूर : आम आदमी पार्टीच्या ऑटो संघटनेच्या वतीने आज मनपा आयुक्त यांना ऑटो रिक्षा सेवा सुरु करण्या बद्दल निवेदन देेण्यात आले. 

आप ने म्हटले आहे, की संपूर्ण जगात कोरोनाचा थैमान सुरु आहे. नागपुर शहरात देखील कोरोनाच्या रुग्णाची संख्या वाढत आहे. या मुळे पूर्ण जगाची आर्थिक परिस्तिति गंभीर झाली आहे. नागपुरात ही लोकांना आर्थिक झळ जाणवली आहे. यात समाजाच्या आर्थिक दृष्ट्या सगळ्यात कामजोक अंगाची बिकट परिस्थिती आहे. 

नागपुर मध्ये ऑटो रिक्षा सेवेन वर्ती कोरोना मुळे बंदी आहे. याच बरोबर टैक्सी सेवा सुरु आहे. या टैक्सी वातानुकूलित आहेत आणि यात कॉन्टेक्ट सरफेस सुद्धा ऑटो रिक्षाहून जास्त आहे. वैद्यकीय दृष्टया ऑटो रिक्षा जास्त सुरक्षित आहे. ऑटो रिक्षा चालक हे समाजाच्या आर्थिक दृष्टयाकमजोर तापक्यातून येतो. मनपा आयुक्तनी या विषयाबाबत विशेष दखल घेण्याची मागणी करण्यात आली.

हे निवेदन देताना आम आदमी पार्टी ऑटो संघटनेचे समन्वयक संजय अनासाने, नागपूर सचिव भूषण ढाकूलकर, अब्दुल हाफिज, इमरान शेख, अब्दुल शाहिद हे उपस्थित होते. 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय