Wednesday, February 28, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : घरेलू कामगारांच्या प्रश्नासाठी राज्यव्यापी लढा

PCMC : घरेलू कामगारांच्या प्रश्नासाठी राज्यव्यापी लढा

15 डिसेंबरला नागपूरला मोर्चा

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : महाराष्ट्र राज्यातील घरेलू कामगारांकडे सरकारचे पूर्ण दुर्लक्ष झालेले असून महामंडळ अस्तित्वात असतानाही त्याला निधी न देता निष्प्रभ करण्याचा प्रयत्न होत आहे घरेलू कामगारांना निर्वाह निधी, आरोग्य विमा, सामाजिक सुरक्षा सह इतर लाभ देण्यात यावे या व इतर मागण्यासाठी   राज्यव्यापी लढण्याचा निर्णय आज करण्यात आला. त्याची सुरुवात 15 डिसेंबर रोजी नागपूर येथे महामोर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबई येथे आंदोलन करण्याचा ठराव आज महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती आणि कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे आज श्रमशक्ती भवन आकुर्डी येथील बैठकीत करण्यात आला.

यावेळी निमंत्रक राजू वंजारे, संयोजक ज्ञानेश पाटील, कामगार नेते काशिनाथ नखाते, सर्वश्रमीकचे उदय भट, ठाणेच्या भावना वाघमारे, लातूरच्या भाग्यश्री रणदिवे, नागपूरचे विलास भोंगाडे, सांगलीचे विजय स्वामी, नाशिकच्या शोभा पवार, धुळ्याच्या संजीवनी शिंदे, नगर च्या द्वारका पवार, जालण्याचे राजेश थोरात, पुणे येथून अनिता गोरे, मीरा सपकाळे, सुजाता भोंगाडे, माधुरी जलमुलवर, प्रियंका काटे, अलका पडवळ, सालिम डांगे उपस्थित होते .

महाराष्ट्र राज्यातील लाख लाख घरेलू कामगारांच्या प्रश्नांसाठी समन्वय समिती अनेक वर्षापासून काम करत असून अंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या परिषदेमध्ये सन 2011 घरेलू कामगार यांना कामगार म्हणून ठराव संमत केलेला असून या सरकारने ठरव सहमती दिलेली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये घरेलू कामगारांचे मंडळ असून ते निर्जीव झालेले आहे सरकारचे याकडे पूर्ण दुर्लक्ष करत असून त्यांना निधी देत नाहीत आणि इतर लाभ ही देत नाहीत अशा परिस्थितीमध्ये घरेलू कामगारांचे जीवन अत्यंत असुरक्षित झालेले असून त्यांना विविध देण्यासाठी शासन स्तरावर लवकरात लवकर प्रयत्न न झाल्यास मुंबई येथे मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. प्रस्तावना संतोष थोरात यांनी केली, सूत्रसंचालना मीरा सपकाळे तर आभार किरण साडेकर यांनी मांनले.

LIC life insurance corporation
संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय