Wednesday, February 28, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : शहरातील नागरीकांचे शिवसेनेत इनकमिंग सुरूच 

PCMC : शहरातील नागरीकांचे शिवसेनेत इनकमिंग सुरूच 

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेने व मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर यांच्या मार्गदर्शनानुसार मावळ लोकसभा मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणावर महिलांनी प्रवेश केला. हा कार्यक्रम वाल्हेकरवाडी येथे संपन्न झाला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख वाल्हेकर म्हणाले कि, देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या कार्याचा ठसा जगभर उमटत आहे तर राज्यात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे जनतेची सेवा करीत आहे. नुकताच त्यांनी शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई बाबतीत मोठा दिलासा दिला आहे. यामुळे मुख्यमंत्री शिंदे हे सर्वांसाठी कार्य करीत असल्याचे दिसून येत आहे.आणि खासदार अप्पा बारणे तर सर्वांना परिचीत आहेच ते मावळ मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने हॅटट्रिक मारणारच आहे, यात तिळमात्र शंका नाही. शिवसैनिकांनी केवळ पदे न घेता सरकारी योजना आणि पक्षाची ध्येय धोरणे नागरिकांपर्यंत पोचवा. सरकारच्या अनेक योजना आहेत. त्या योजना तळागाळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचवा.

पिंपरी विधानसभा मतदारसंघांमध्ये शेकडो महिलांनी प्रवेश केला. यामध्ये सुवर्णा कुटे, सुरेखा हिरालाल वारडे, सारिका गवारे, अपर्णा आगाशे, मालती वारडे, जयश्री चिकणे, सुप्रिया पॅंटी, श्रद्धा कापडी, मालती सोनवणे, उषा सोनवणे, शोभा शहा, दीप्ती खानविलकर, जया क्षीरसागर, सुनीता कांबळे, चित्रा गालकडे, भारती मोहिते, तसेच जुन्या महिला पदाधिकाऱ्यांना पदोन्नती पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. 

यासाठी प्रामुख्याने पिंपरी विधानसभा संघटिका शैलाताई निकम, व शहर संघटिका सरिताताई साने यांनी विशेष प्रयत्न केले.

कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, तसेच शिवसेना शहर प्रमुख निलेश तरस, ज्येष्ठ शिवसैनिक केशव सरोदे, संगीताताई कदम, अंजली चव्हाण, छायाताई बाळासाहेब वाल्हेकर सर्व शिवसैनिक महिला उपस्थित होत्या.

Mahaegs Maharashtra Recruitment
संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय