Sunday, May 19, 2024
Homeराज्य२१ मे रोजी नाशिक येथे AISF चे राज्य अधिवेशन

२१ मे रोजी नाशिक येथे AISF चे राज्य अधिवेशन

नाशिक : ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन (AISF) महाराष्ट्राचे १६ वे अधिवेशन नाशिक सिडको परिसरातील नारायण मेघाजी लोखंडे सभागृह, कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय, राजे संभाजी स्टेडियम बाजूला सिंहस्थ नगर येथे दि.२१ मे २०२३ रोजी आयोजित करण्यात आले आहे.

अधिवेशनाचे उद्घाटन देशातील अग्रगण्य मानवाधिकार कार्यकर्त्या तथा पद्मश्री पुरस्कार विजेत्या तीस्ता सेटलवाड तसेच ज्येष्ठ विधीज्ञ, बार कौन्सिल ऑफ इंडिया चे विद्यमान सदस्य तथा बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा माजी अध्यक्ष ॲड. जयंत जायभावे करतील. एआयएसएफ चे राज्याध्यक्ष विराज देवांग हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.

ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन (एआयएसएफ) या देशातील राष्ट्रीय पातळीवर स्थापन झालेली पहिली विद्यार्थी संघटना म्हणून प्रसिद्ध आहे. संघटना लवकरच ८८व्या वर्षात पदार्पण करीत आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात संघटनेचे भरीव योगदान राहिले असून अनेकांनी प्राणाची आहुती दिली आहे. स्वातंत्र्यानंतर शिक्षण हक्क चळवळीत संघटना देशपातळीवर मोलाचे योगदान देत असून दर तीन वर्षांनी संघटनेचे राष्ट्रीय तसेच राज्य स्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात येत असते. यंदाचे १६ वे राज्य अधिवेशन सिडको परिसरातील नारायण मेघाजी लोखंडे सभागृह, कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय, राजे संभाजी स्टेडियम बाजूला सिंहस्थ नगर येथे दि.२१ मे २०२३ रोजी आयोजित करण्यात आले आहे.

सदर अधिवेशनासाठी उद्घाटक म्हणून देशातील अग्रगण्य मानवाधिकार कार्यकर्त्या तथा पद्मश्री पुरस्कार विजेत्या तीस्ता सेटलवाड तसेच ज्येष्ठ विधीज्ञ, बार कौन्सिल ऑफ इंडिया चे विद्यमान सदस्य तथा बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा माजी अध्यक्ष ॲड. जयंत जायभावे करतील. प्रमुख अतिथी म्हणून एआयएसएफ चे राष्ट्रीय सचिव दिनेश सिरंगाराज (चेन्नई), राष्ट्रीय छात्रा समन्वयक संघमित्रा जेना (भुवनेश्वर), एआयएसएफ चे माजी महासचिव ॲड. अभय टाकसाळ (छ. संभाजी नगर), राज्यसचिव प्रशांत आंबी (कोल्हापूर) आदी उपस्थित असतील. एआयएसएफ चे राज्याध्यक्ष विराज देवांग हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.

सदर अधिवेशनात देशातील विशेषतः राज्यातील शैक्षणिक परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीतून उद्भवणाऱ्या समस्या आदी समस्यांवर प्रतिनिधी सत्रात चर्चा करण्यात येईल. यावेळी मागील तीन वर्षांतील संघटनात्मक कामाचा आढावा घेऊन पूढील ३ वर्षांकरिता कृती कार्यक्रम आखण्यात येईल. याप्रसंगी पुढील ३ वर्षांसाठी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येईल. अधिवेशनासाठी राज्यातील २० जिल्ह्यातून निवडक १५० प्रतिनिधी उपस्थित असतील.

अधिवेशन परिसराचे नाव स्वातंत्र्य सैनिक शहीद हेमू कलानी नगर देण्यात येणार आहे. हेमू कलानी हे वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी शहीद झालेले सिंध प्रांतातील एआयएसएफ सोबत जोडलेले विद्यार्थी नेते असून २०२३ हे हेमू कलानी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. अधिवेशनाच्या सभागृहाचे नामकरण हे स्वातंत्र्य सैनिक तथा अण्णाभाऊ साठे यांच्या लाल बावटा कला पथकातील सहकारी दिवंगत कुसुमताई माधवराव गायकवाड यांच्या नावे करण्यात येणार आहे. अधिवेशनाला यशस्वी करण्याचे आवाहन एआयएसएफ चे माजी नेते तथा कामगार नेते राजू देसले व तल्हा शेख, प्राजक्ता कापडणे, गायत्री मोगल, कैवल्य चंद्रात्रे, हर्षाली अढांगळे यांनी केले आहे.

हे ही वाचा :

मोठी बातमी : किरन रिजिजू यांना कायदा मंत्रीपदावरुन हटविले, “हे” असतील नवे कायदा मंत्री

मोठी बातमी : बैलगाडा शर्यतीबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल!

मांजरी अभियांत्रिकी महाविद्यालयास पीडीसीसी बँकेतर्फे अनुदान प्राप्त

विशेष लेख : मोबाईल अतिरिक्त वापराचे दुष्परिणाम

बैलगाडा शर्यतीचा ऐतिहासिक निकाल बळीराजाला समर्पित! – आमदार महेश लांडग

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय