Sunday, May 19, 2024
HomeNewsघंटागाड्यांची धून पुन्हा सुरू करा-अण्णा जोगदंड

घंटागाड्यांची धून पुन्हा सुरू करा-अण्णा जोगदंड

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: घंटागाड्यांना ओला कचरा व सुका कचरा बंद पडलेली धून पुन्हा सुरू करण्याची मागणी मानवी हक्क संरक्षण जागृती चे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी प्रशासनाकडे केली आहे.

नव्या सांगवीतील बऱ्याच घंटागाड्यांना ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण करण्याची  धुन लावली आहे. पण घंटागाडीच्या समतानगर गल्ली नंबर 1,2 संततुकाराम नगर गल्ली नंबर 1,2महाराष्ट्र काँलनी,भारत बेकरी रोड,टॉवर रोड या भागामध्ये गाडी असते या भागातील गाड्यावर गेल्या पाच महिन्यापासून ती धुन बंद झाली आहे.महिन्याभरापासून मी आरोग्य निरीक्षक सचिन जाधव यांनाही वारंवार फोन करून कल्पना दिली.मात्र सदरची धून अद्यापही सुरू करण्यात आलेली नाही.असे अण्णा जोगदंड यांनी सांगितले.

नागरिकांना ओला कचरा व सुका कचरा देण्याची या गाड्यांची धून ऐकून सवय झाली आहे नागरिक गाड्याचं धून ऐकून कचरा घेऊन घराबाहेर येतात.परंतु साधा हॉर्न असल्यामुळे सकाळी शाळेच्या गाड्या इतर गाड्या ही गाड्या सारखाच हार्न वाजत असल्याने नागरी कचरा घराबाहेर घेऊन येतात आणि घंटागाडी बघून परत जातात हे असे पाच महिन्यापासून चालू आहे.सध्या नागरिकांना घंटागाडीचा आवाज व साध्या गाडीचा आवाज सारखाच असल्यामुळे नेहमी चुकल्यासारखे होते, काही वेळेस चालकांच्या बाजूला आरसा ही नसतो यामुळे घंटागाडीच्या चाकाजवळ जाऊन कचरा नागरिक टाकतात यामुळे दुर्घटना होऊ शकते.

यावेळी जोगदंड म्हणाले की गेल्या  महिन्याभरापूर्वीच आयुक्तांनी स्वच्छता बाबतीत पालिकेचा 19 व्या क्रमांकावरून पहिला क्रमांक येण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढवला आहे व विविध संघटना व नागरिकांना स्वच्छता चॅम्पियन म्हणून आयुक्तांनी सन्मानित केले आहे.पण पालिकेचे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होताना दिसते ते ठेकेदार कंपनीवर एवढे मेहरबान का झालेत असा प्रश्न मला पडला आहे..

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय