Sunday, May 19, 2024
HomeNewsमाजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांची भाजप प्रदेश कार्यकारीणीवर नियुक्ती

माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांची भाजप प्रदेश कार्यकारीणीवर नियुक्ती

पिंपरी-चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: पिंपरी चिंचवड महापालिकेचे भाजपचे रहाटणीतील माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

चंद्रकांत नखाते 2002 मध्ये महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2017 च्या निवडणुकीमध्ये भाजप पक्षाच्या तिकिटावर दणदणीत विजय मिळवून निवडून आले. 2021 ते 2022 मध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(पीएमआरडीए) सदस्य म्हणून काम केले.त्यांचे उल्लेखनीय सामाजिक व राजकीय कार्य पाहून त्यांची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणीवर निमंत्रित सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आल्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना दिले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय