Friday, May 17, 2024
Homeक्रीडाविश्वस्पिनर किंग हरपला ! शेन वॉर्न यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन!

स्पिनर किंग हरपला ! शेन वॉर्न यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन!

नवी दिल्ली : जगातील महान फिरकी गोलंदाजांपैकी एक असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. ५२ वर्षीय वॉर्न हा ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. शेन वॉर्न थायलंडमध्ये उपस्थित होता. 

फॉक्स न्यूजनुसार, शेन वॉर्न त्याच्या व्हिलामध्ये उपस्थित होता, आणि तो बेशुद्ध अवस्थेत आढळला. या फॉरमॅटमध्ये त्याने 145 टेस्ट मॅचमध्ये 708 विकेट्स घेतल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याने 293 विकेट घेतल्या.

शेन वॉर्नने आपल्या खेळाने जगाला जितके प्रभावित केले आहे तितकेच त्याच्या वादांमुळे क्रिकेट जगतात निराशा झाली आहे. 1998 मध्ये, वॉर्नला बुकीला माहिती दिल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला होता आणि 2003 च्या विश्वचषकाच्या काही दिवस आधी बंदी घातलेल्या पदार्थांचे सेवन केल्याबद्दल दोषी आढळल्याने त्याच्यावर एक वर्षासाठी क्रिकेटमधून बंदी घालण्यात आली होती. 1996 मध्ये भारतात झालेल्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजविरुद्ध वॉर्नने शानदार गोलंदाजी केली होती. ऑस्ट्रेलिया विश्वचषक विजेत्या संघाचा तो महत्त्वाचा सदस्य होता.

ऑस्ट्रेलियाच्या या महान गोलंदाजाने 2007 मध्ये क्रिकेटला अलविदा केला होता. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 1000 बळींचा टप्पा गाठणारा शेन वॉर्न हा जगातील दुसरा गोलंदाज आहे. या यादीत मुथय्या मुरलीधरन पहिल्या क्रमांकावर आहे. वॉर्नच्या नावावर कसोटीत ७०८ विकेट्स, तर एकदिवसीय सामन्यात २९३ बळी घेण्याचा विक्रम आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय