Thursday, January 23, 2025

सोलापूर : शिक्षकेतर संघटनेकडून 7 व्या वेतन आयोगासाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक

सोलापूर, दि १४ : आयटक संलग्न विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतिने शिक्षकेतरांना आश्‍वासित प्रगतीयोजनेचे 12 व 24 वर्षांचे रद्द झालेले शासन आदेश पुर्नजिवीत करून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा व 7 व्या वेतन अयोगाचा लाभ विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतरांना तातडीने द्या हि मुख्य मागणी घेवून राज्यातील महाविद्यालय कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे.

दिनांक 21 जून ते 26 जून 2021 छत्रपती शाहू महारांच्या जयंती पर्यंत मागणी सप्ताह करून या काळात महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी हातात पोस्टरधरून फोटो काढून ते फोटो मुख्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री, उपमुख्यमंत्री, संचालक व सहसंचालक उच्च शिक्षण यांना मेल, फेबसबुकला, टिव्टर ला टॅग व मेसेज करणार आहेत. 

तसेच पुढे हे आंदोलन सातवा वेतन आयोग मिळेपर्यंत खिशाला काळ्या फिती लावणे, लाक्षणिक उपोषण, निदर्शेने आंदोलन या मार्गाने पुढे चालू राहणार आहे.

आयटकचे नेते व संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड तानाजी ठोंबरे म्हणाले, “शासनाने हे आंदोलन कर्मचारी वर्गावर लादले आहे.  उच्च शिक्षण क्षेत्रातील शिक्षकेत्तर या महत्वाच्या घटकाकडे दुर्लक्ष केल्याने ते तिव्र नाराजी या अंदोलनातून व्यक्त करतील व आपले हक्क मिळवितील हे आंदोलन लोकशाही मार्गाने पूढे जात राहील.”

निवेदनावर संघटनेचे कॉम्रेड तानाजी ठोंबरे, ए. बी. कुलकर्णी, प्रविण मस्तुद, आरती रावळे, उमेश मदने,  विलास कोठावळे, हणुमंत कारमकर यांच्या सह्या आहेत.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles