Saturday, December 7, 2024
Homeजिल्हाSolapur : जनता विरोधी धोरणे राबविणाऱ्या भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांचा पराभव...

Solapur : जनता विरोधी धोरणे राबविणाऱ्या भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांचा पराभव करा – माजी आमदार नरसय्या आडम मास्तर

Solapur : देश घातकी, जनता विरोधी धोरणे राबविणाऱ्या भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांचा दारुण पराभव करा आणि धर्मनिरपेक्ष, लोकशाही, समाजवादी सरकार स्थापन करण्यासाठी इंडिया आघाडीला विजयी करा, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते, माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी पत्रकार परिषदेत केले. Solapur News

भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) च्यावतीने सध्या देशात होत असलेल्या 18 व्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्रात इंडिया आणि महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी पुरस्कृत, अधिकृत उमेदवार यांना पाठींबा देणे व पक्षाची राजकीय भूमिका जाहीर करण्यासाठी माकपचे मध्यवर्ती कार्यालय, दत्त नगर लाल बावटा कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत आज (दि.८) ते बोलत होते. Solapur

या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर, माकप चे जिल्हा सचिव ॲड.एम.एच.शेख, सचिव मंडळ सदस्य रंगप्पा मरेड्डी, कुरमय्या म्हैत्रे,सिद्धप्पा कलशेट्टी, व्यंकटेश कोंगारी,युसुफ शेख(मेजर), अब्राहम कुमार, नसीमा शेख, शेवंताताई देशमुख, सुनंदा बल्ला, ॲड. अनिल वासम आदींची उपस्थिती होती.

आडम मास्तर म्हणाले, भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) आपला जाहीरनामा भारतातील लोकांसमोर स्पष्टपणे मांडते की भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचा पराभव करणे आणि देशात धर्मनिरपेक्ष लोकशाही राज्य घटनेवर आधारित सरकार स्थापन करणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे. हे सामूहिक कर्तव्य बळकट करण्यासाठी आणि केंद्रात धर्मनिरपेक्ष सरकारच्या स्थापनेला मदत करण्यासाठी माकप आपल्या क्षमतेनुसार सर्वकाही करण्याचे वचन देते. यासाठी आणि लोकाभिमुख धोरणे सुनिश्चित करण्यासाठी माकप ची संसदेत मजबूत उपस्थिती आवश्यक आहे. Solapur News

माकप धर्माला राजकारण, राज्य, सरकार आणि प्रशासनापासून वेगळे ठेवण्याच्या तत्त्वाशी तडजोड न करता लढण्याचे वचन देते आणि ते तंतोतंत पालन ही करते. याच अनुषंगाने मुंबई येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष राज्य समिती ची बैठक १ व २ मार्च रोजी माकप चे पॉलिट ब्युरो सदस्य डॉ.अशोक ढवळे व कॉ. निलोत्पल बसू यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र राज्यात माहविकास आघाडी आणि माकप ची १८ व्या लोकसभा निवडणुकी बाबत राजकीय भूमिका, पाठींबा आणि पुढील कार्यक्रमाची दिशा ठरविण्यात आली, असल्याचेही त्यांनी सांगितले. Solapur News

एकंदरीत राष्ट्रीय, राज्य आणि जिल्ह्यातील समस्यांचा निपटारा करण्यासाठी आज देशाला विकासाची दृष्टी, जनतेच्या हिताची धोरणे आणि कल्याणकारी राज्याच्या संकल्पना अंमलात आली पाहिजे. वास्तविक पाहता आपला जिल्हा हा सर्व दृष्टीने विकासाकडे नेण्यासाठी सक्षम आहे. पण गेल्या १० वर्षात याला योग्य गती नाही, विकासाची योग्य दृष्टी नाही, राजकीय ईच्छाशक्तीचा अभाव आहे. म्हणून देशात राष्ट्रीय पातळीवर इंडिया आणि महाराष्ट्र राज्यात महाविकास आघडी ही जनतेच्या सर्व समस्या, राज्याचा परिपूर्ण विकासाचे ध्येय घेऊन लोकसभेच्या निवडणुकीत उतरले असून महाविकास आघाडी पुरस्कुत, अधिकृत उमेदवार सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदासंघातील आमदार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांना महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष म्हणून माकप च्या वतीने जाहीर पाठिंबा जाहीर करत असून मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. जनता विरोधी धोरणे राबवणाऱ्या केंद्र सरकारचे उच्चाटन करण्यासाठी राज्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी, सोलापूर जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी प्रणिती शिंदे यांना मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन माकप च्या वतीने करण्यात येत असल्याचेही आडम मास्तर म्हणाले.

ते पुढे म्हणाले, आज देशात अल्पसंख्याक व मुस्लिम विरुद्ध हिंदू हे देशाची एकता नष्ट करणारे चित्र जाणीवपूर्वक निर्माण केले जात आहे. CCA कायदा पारित करून देशातील २० कोटी मुस्लिम समाज बांधवांना दुय्यम नागरिकत्व देण्याचा घाट घातला आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने २६ फेब्रुवारी २०१४ साली वन रँक वन पेन्शन “असे सूचित करते की सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीची तारीख आणि निवृत्तीवेतनाच्या दरांमध्ये भविष्यातील कोणतीही वाढ विचारात न घेता समान पदावर सेवानिवृत्त होणाऱ्या सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांना एकसमान पेन्शन दिले जावे, जे आपोआप भूतकाळातील निवृत्तीवेतन धारकांना दिले जाईल.” याची अद्याप अंमलबजाणी झाली नाही यावरून खरे देशभक्त कोण हा संशोधनाचा विषय आहे. ईपीएस-९५ योजनेच्या सूत्रानुसार कंपनी किंवा मालकांकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या १५ हजार रुपयांवर ८.३३ टक्के रक्कम पेन्शन फंडात जमा केली जाते व उर्वरित ३.६७ टक्के रक्कम भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा केली जाते. त्यामुळे खासगी, असंघटित क्षेत्रातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना केवळ ५०० ते २२०० रुपये निवृत्त वेतन मिळते.ही अत्यंत तुटपुंजी असून यांना किमान दरमहा १० हजार रुपये पेन्शन मिळाले पाहिजे. आजमितीस ७५ लाख असंघटीत कामगार सेवानिवृत्त झाले असून त्यांना दररोज जीवन मरणाची लढाई करावी लागत आहे. सरकार च्या तिजोरीत १५ लाख कोटी रुपये जमा आहेत ती रक्कम मोदी सरकार सट्टा बाजारात गुंतवले आहेत.हे अक्षम्य पाप आहे. यामधून कोट्यवधी रुपयांची व्याज मिळत असून याबाबत कोशीयारी समितीचा निर्णय घेऊन आजच्या घटिकेला ८ वर्षे लोटली आहेत. परंतु सबका साथ सबका विकास ची घोषणा देणाऱ्या मोदी सरकारने निर्णय घ्यायला तयार नाहीत याहून दुसरे दुर्दैव असूच शकत नाही.

भारतीय व्यापार संस्थेच्या अधिनियमात ज्या उद्योगात सरकारी भाग ५१ टक्के वा जास्त आहेत असे सरकारी सार्वजनिक उद्योग धंदे देशोधडीस लावले आणि खाजगी बड्या भांडवलदारांना राष्ट्रीय संपत्ती लुटण्याचे मार्ग सुलभ करून दिले. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम होऊन दारिद्र्याचा आलेख चढत्या क्रमाने वाढू लागला. केंद्र सरकारने २००४ साली कर्मचारी पेन्शन योजना बंद केली. त्यामुळे आयुष्यभर सेवा बजावलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या पदरी घोर निराशा आली. यासाठी जुनी पेन्शन योजना लागू करा ही मागणी घेऊन महाराष्ट्र राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलनाची मालिका सुरू आहे यावर सरकार मुग गिळून गप्प बसले आहे. Solapur News

भारताच्या अखंडता आणि सार्वभौमत्वाच्या विरोधात सुरू असलेल्या कृत्यांना आळा घालणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्याला दहशतवादविरोधी कायदा असेही म्हणतात. यूएपीए हा भारतातील सर्वात कडक असा दहशतवादविरोधी कायदा समजला जातो. देशविरोधी कारवायांचा सामना करण्यासाठी १९६७ मध्ये पहिल्यांदा हा कायदा करण्यात आला.पण या कायद्याचा सर्रास गैरवापर करून साहित्यिक, संशोधक, पत्रकार, विचारवंत, समाजसेवक, समाजसुधारक, राजकीय नेते यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून लोकशाही आणि कायद्याचे राज्य ही संकल्पना पूर्णतः रसातळाला नेली आहे. या विरुद्ध जनतेचा आवाज बुलंद होणे काळाची गरज आहे. Solapur News

जिवाचे रान करून शहरी व ग्रामीण भागात आरोग्याची अचूक आणि कर्तव्यदक्ष पणे सेवा बजावणाऱ्या आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक यांनी मानधन वाढीसाठी अविश्रांत लढाई केले. अंगणवाडी सेविकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ग्रज्युएटी व दरमहा २६ हजार मानधन देऊन सरकारी कर्मचारी दर्जा द्या.

आशिया खंडातील सर्वात मोठे गृहप्रकल्प गौरवण्यात आलेल्या सोलापूर शहरात कामगारांच्या अव्याहत परिश्रम आणि अंखड चळवळीतून कॉ.गोदूताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून १० विडी कामगारांची हक्काची घरे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळात वितरित करण्यात आले मात्र आज त्या ठिकाणी रस्त्यांची अत्यंत दैना झाली आहे अंतर्गत रस्ते व ड्रेनिज साठी किमान १०० कोटी निधीची आवश्यकता आहे. तसेच कॉ.मीनाक्षी साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून विडी कामगारांना ५१०० हक्काची घरे हस्तांतरीत करण्यात आले. या आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांचे नाममात्र मुद्रांक शुल्क आकारले पाहिजे. रे नगर ही जगातील सर्वात मोठी एकमेव ३० हजार असंघटीत कामगारांचा पथदर्शी, महत्त्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प चे नुकतेच मा. पंतप्रधान यांच्या हस्ते हस्तांतरण करण्यात आले. परंतु या लाभार्थ्यांवर आज २ लाख बँकेच्या कर्जचा बोजा आहे. याचे कारण पूर्वी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत राज्य केंद्राचे साडे चार लाख रुपयांचे अनुदान होते ते त्यात घट करून ते अडीच लाखावर आणले. याचा फटका आर्थिक दुर्बल घटकातील गरीब, कष्टकरी, असंघटीत कामगारांना बसत आहे. त्यासाठी त्यांना २ लाख रुपये वाढीव अनुदान मिळावे, या प्रामुख्याने जनतेच्या मागण्या असल्याचेही ते म्हणाले. Solapur News

माकपने केलेल्या मागण्या :

१. वाढती महागाई आटोक्यात व दैनंदिन जीवनावश्यक वस्तूचे दर कमी केले पाहिजे.
२. सार्वजनिक वितरण प्रणाली मजबूत करा व मागेल त्याला प्रत्येक कुटुंबाला ३५ किलो धान्य मिळाले पाहिजे.
३. वाढती बेरोजगारी रोखण्यासाठी नोकर भरती बंदी उठवा व बेरोजगारांना दरमहा ५००० रुपये रोजगार भत्ता लागू करणे.
४. कामगारांनी रक्तरंजित क्रांती करून मिळविलेले ४४ कामगार कायद्यांचे ४ कामगार संहितेत रुपांतर करून प्रतीगामे बदल केले ते रद्द करावे.
५. २०१६ पासून विडी कामगारांसाठी अस्तित्वात असलेले कल्याणकारी मंडळ निष्क्रिय झाले असून कामगारांना मिळणारे लाभ बंद केले आहेत ते पूर्ववत सुरु करून सर्व लाभ वितरीत करणे.
६. विडी कामगारांना फरकासहित किमान वेतन रु.२१० व महागाई भत्ता रु. १४७.६१ असे एकूण रु. ३५७.६१ किमान वेतन लागू करणे.
७. विडी कामगारांना कारखान्यातच रोख मजुरी देणे.
८. असंघटीत कामगारांना कोशियारी कमिटीच्या शिफारसीनुसार ७५०० रुपये पेन्शन व २५०० रुपये महागाई भत्ता असे एकूण १०००० रुपये देणे.
९. यंत्रमाग कामगारांना माथाडी कायद्याच्या धर्तीवर यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करून सर्व कामगार कायद्यांचे लाभ मिळवून द्या व सामाजिक सुरक्षा लागू करणे.
१०. यंत्रमाग कामगारांना फरकासहित किमान वेतन व महागाई भत्ता दरमहा १५७९७/- रुपये मिळावे, ओळखपत्र, हजेरी कार्ड, पगार पत्रक कारखानदारामार्फत मिळावे व यंत्रमाग कामगारांची सहा.कामगार आयुक्त कार्यलयात नोंदणी करणे.
११. जगातील ३० हजार असंघटीत कामगारांचा महत्वाकांक्षी, पथदर्शी गृहनिर्माण प्रकल्प रे नगर च्या लाभार्थ्यांना वाढीव २ लाख १० हजार अनुदान देणे.
१२. रे नगरच्या लाभार्थ्यांना नाममात्र व परवडणाऱ्या दरात सौरऊर्जा बसवणे.
१३. रे नगरची अकृषिक आकारणी शुल्क रद्द करणे.
१४. रे नगर फेडरेशन च्या कुर्बान हुसेन अल्पसंख्यांक महिला कामगार सहकारी गृह. संस्था, कॉ. एम. के.पंधे यंत्रमाग कामगार सहकारी गृह.संस्था तसेच कॉ.मीनाक्षीताई साने महिला विडी कामगार सह.गृह.संस्था यांना ६७ एकर जागेवरील वरील अटी-शर्ती शिथिल करणे.
१५. रे नगर फेडरेशनच्या आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना लावण्यात आलेल्या १ टक्का लेबर सेस रद्द करणे.
१६. आशिया खंडातील सर्वात मोठे एकमेव महिला विडी कामगारांचा गृहनिर्माण प्रकल्प कॉ.गोदुताई परुळेकर वसाहतीतील सांडपाणी, मलनिस्सारण सर्वेक्षण झाले असून यासाठी ७५ कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. तो निधी तात्काळ देणे.
१७. २००६ साली केलेल्या रस्त्यांचे अद्यापही पुनःडांबरीकरण झालेले नसून कॉ.गोदुताई परुळेकर वसाहतीतील १६ कि.मी. अंतर्गत रस्त्यांसाठी ९ कोटी ७५ लाख निधीची आवश्यकता आहे. सदर निधी मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत निधी उपलब्ध करून देणे.
१८. कॉ.मीनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या लाभार्थ्यांना रे नगरच्या धर्तीवर मुद्रांक शुल्क नाममात्र दर १००० रुपये लागू करणे.
१९. महाराष्ट्रातील हातमाग कामगारांसाठी जाहीर केलेल्या शासन निर्णयामध्ये हातमाग कामगार विणल्या जाणाऱ्या सिल्क साडीचा समावेश करून फेर शासन निर्णय जाहीर करून सर्व हातमाग कामगारांना उत्सव भत्ता देणे.
२०. रेडीमेड-शिलाई कामगारांना कामगार कायदे लागू करून किमान वेतन, सामाजिक सुरक्षा मिळवून देणे.
२१. भ्रष्टाचार निर्मुलन करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंध कायदा मजबूत करणे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर

मोठी बातमी : एकनाथ खडसे यांची लवकरच भाजपमध्ये घर वापसी होणार

मोठी बातमी : कल्याण लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीसांकडून उमेदवार जाहीर

वेळ पडल्यास उमेदवारांना हॅलिकॉफ्टरने आणू, हसन मुश्रीफ यांचे मोठे विधान

मोठी बातमी : श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान

अभिनेत्री कंगना रणौत झाली होती बारावीत नापास, आज भाजपची लोकसभेची उमेदवार

कंगना राणौतने भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून घेतले ‘यांचे’ नाव, लोक करताहेत ट्रोल

आरटीई कायद्यातील बदलाच्या आदेशाची प्रत जाळून पालकांनी केला निषेध!

संबंधित लेख

लोकप्रिय