Thursday, January 23, 2025

दिघी मध्ये ‘स्लो सायकल स्पर्धा’ मोठ्या उत्साहात सपंन्न !

दिघी : १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना निमित्त मॅविक सायकल क्लब आयोजित व पै. ज्ञानेश आल्हाट यांच्या सैजन्याने स्लो सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

भारत देशाचे राष्ट्रगीत घेऊन व ‘भारत माता की जय’ घोषणा देत स्पर्धेचे उद्धघाटन नगरसेविका आशाताई सुपे, ज्ञानेश आल्हाट, सायकल पटू अतुल चव्हाण, दिघी विकास मंच अध्यक्ष हारिभाऊ लबडे यांच्या शुभ हास्ते करण्यात आले.

स्पर्धेमध्ये ऐकुण ४० सायकल पटू नी भाग घेतला होता. विजयेत्या स्पर्धकानां दोन गटांत मध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकास मानचिन्ह व प्रमाणपत्रक आणि दोन स्पर्धकानां उत्कृष्ट सायकल पटू मानचिन्ह देण्यात आले.

स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक सायकल पटूनां प्रमाणपत्रक देण्यात आले. खेळाडूनां आहार व व्यायामचे मार्गदर्शन सायकल पटू अतुल चव्हाण यांनी केले. स्लो सायकल स्पर्धेचे परिक्षक म्हणून दत्ता घुले यांनी काम पाहिले.

या वेळी दिघी विकास मंचाचे सुनिल काकडे, धनाजी खाडे, विकी आकुलवार, नामदेव रढे, के. के. जगताप, समाधान कांबळे, पांडूरंग मेहत्रे, रमेश विरनक, अमोल देवकर, बाळू सुपे, संदिप कनसे, दत्ता माळी, मॅविक सायकल क्लबचे निखिल बोबले, जुनेद मुलाणी, मयुर पिंगळे, सुभाष पिंगळे, ओंकार राऊत, विकी गवर, कुलदिप कोकाटे आदीनी परिश्रम घेतले.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles