जुन्नर / आनंद कांबळे : भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) या राष्ट्रीय पक्षाचे महासचिव, माजी खासदार व इंडिया आघाडीचे प्रमुख नेते कॉ.सीताराम येचुरी (Com.Sitaram Yechury) यांचे नुकतेच दिल्ली येथे दूख:द निधन झाले. त्यांच्या कार्य कर्तुत्वाला अभिवादन करण्यासाठी व त्यांना आदरांजली वाहण्यासाठी घोडेगाव,ता.आंबेगाव येथे आदरांजली सभा पार पडली. या सभेचे आयोजन माकप आंबेगाव तालुका समितीच्या वतीने करण्यात आले होते. याप्रसंगी विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधी यांनी उपस्थित राहून कॉ.सीताराम येचुरी यांना आदरांजली अपर्ण केली.
यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते कॉ.सीताराम येचुरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली सभेची सुरुवात करण्यात आली.या सभेचे प्रस्ताविक कॉ.अमोल वाघमारे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकेत कॉ.सीताराम येचुरी यांच्या निधनाने केवळ डाव्या चळवळीची हानी झाली नाही तर देशाची ही हानी झाली आहे असे नमूद करत त्यांच्या वैचारिक बांधिलकी व कार्याचा संक्षिप्त आढावा घेतला.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या मा.पूर्वाताई वळसे पाटील यांनी आदरांजली व्यक्त करत असताना, भारतीय नेत्यामध्ये मला आवडणाऱ्या नेत्यांपैकी एक नेते म्हणजे कॉ.येचुरी होय असे नमूद केले. कॉ.येचुरी यांनी विद्यार्थी दशेपासून ते आजपर्यंत केलेले काम हे असामान्य आहे. असे ही त्यांनी याप्रसंगी नमूद केले.
यावेळी कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते मा.अशोक काळे पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती संजय गवारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मा.प्रकाश घोलप, सामाजिक कार्यकर्ते यशराज काळे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री.अक्षयशेठ काळे, खेड तालुका किसान सभेचे सचिव कॉ.अमोद गरुड, बोरघर ग्रामपंचायतचे उपसरपंच कॉ.राजू घोडे, किसान सभेचे नेते कॉ.अशोक पेकारी, कॉ.रामदास लोहकरे, कॉ.बाळू काठे, कॉ.दत्ता गिरंगे एसएफआय संघटनेचे दीपक वालकोली, समीर गारे, रोहिदास फलके, अक्षय काळोखे, जनवादी महिला संघटनेच्या कमल बांबळे, सुप्रिया मते,आदिम संस्थेचे स्नेहल साबळे, दिपाली वालकोळी, डीवायएफआय संघटनेचे अविनाश गवारी,बाबू आंबवणे, राहुल कारंडे, शहीद राजगुरू ग्रंथालयाचे अशोक जोशी यांनी उपस्थित राहून कॉ.सीताराम येचुरी यांना आदरांजली वाहिली.
यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कॉ. सीताराम येचुरी यांना अखेरचा लाल सलाम करत जोरदार घोषणानी या आदरांजली सभेची सांगता झाली.
Sitaram Yechury
हेही वाचा :
संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग
ड्रायव्हींग लायसन्सच्या ‘स्मार्ट कार्ड’ रूपांतरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत
धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती
ब्रेकिंग : मलायकाच्या वडिलांची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
शेतात काम करताना विद्युत तारेचा स्पर्श, चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू
JCI : ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती