Friday, November 22, 2024
Homeराज्यधक्कादायक : पाहता पाहता कावनई किल्लाचा काही भाग कोसळला

धक्कादायक : पाहता पाहता कावनई किल्लाचा काही भाग कोसळला

नाशिक : इर्शाळवाडीची घटना ताजी असतांना आता नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इगतपुरी तालुक्यातील कावनई किल्ल्याचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरु आहे. नाशिक जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस होत आहे. अशात इगतपुरी तालुक्यातील कावनई किल्ल्याचा काही भाग आज कोसळला आहे. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तहानी झालेली नाही. या घटनेचा एक थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला आहे.

किल्ल्याचा पोकळ झालेल्या भुभागातील वजनदार दरड खाली घरंगळत आली. सुदैवाने कुठल्याही प्रकारचे जीवित हानी झाली नसली तरी नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, या घटनेनंतर इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर यांनी घटना स्थळाची पहाणी केली. किल्ल्याच्या पायथ्याशी शेतात राहणाऱ्या नागरिकांना गावात सुरक्षितस्थळी जाण्याबाबत सूचित करण्यात आले आहेत.

हे ही वाचा :

मणिपूरमध्ये महिलांची निर्वस्त्र धिंड ; चार आरोपींना अटक

ब्रेकिंग : ‘या’ 4 जिल्ह्यांना आज ‘रेड ॲलर्ट’ ; तर “या” जिल्ह्यांना ‘ऑरेंज ॲलर्ट’

मणिपूर : प्रियंका गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा, तुम्ही विचलित कसे होत नाही?

मणिपूर लांछनास्पद घटनेचे पडसाद, कष्टकरी महिलांकडून पिंपरी चिंचवड मध्ये संतप्त आंदोलन

मेगा भरती : एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत 4062 पदांची भरती

डॉ. आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पाडल्याच्या निषेधार्थ आंबेडकर अनुयायांचा ‘लॉग मार्च’

भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार माहिती आहेत का? तर ‘हे’ आमदार सर्वात गरीब…यादी पहा !

संबंधित लेख

लोकप्रिय