Tuesday, May 21, 2024
Homeराजकारणउदयपूरप्रमाणे पुण्यात काही घडू नये यासाठी… संजय राऊत यांनी व्यक्त केली चिंता

उदयपूरप्रमाणे पुण्यात काही घडू नये यासाठी… संजय राऊत यांनी व्यक्त केली चिंता

पुणे : भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्माच्या वादग्रस्त वक्तव्याचे समर्थन केल्याने राजस्थानमधील उदयपूरमध्ये एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्याकांडामुळे देशभरात तणावाचे वातावरण आहे. अशात ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती केंद्रीय तपास यंत्रणांना मिळाली आहे. यावरून संजय राऊत यांनी ट्विट करत दवेंबाबत चिंता व्यक्त केली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ब्राम्हण महासंघाचे नेते आनंद दवे यांच्या जिवितास धोका असल्याचं म्हणत पुणे पोलिसांकडे त्यांना सुरक्षा देण्याची मागणी राऊत यांनी ट्वीटरद्वारे केली आहे. संजय राऊत यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की, ‘ब्राम्हण महासंघाचे नेते, कडवट हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद दवे यांच्या जिवितास धोका असल्याचं केंद्रीय तपास यंत्रणानी महाराष्ट्र पोलिसांना कळवले आहे. उदयपूरप्रमाणे काही पुण्यात घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी आनंद दवे यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी.’ या शब्दात राऊत यांनी ट्विट केलं आहे.

दरम्यान, देशभरातील या तणावाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी केलेल्या या ट्वीटनंतर आता पुणे पोलीस काय पावलं उचलणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय