Friday, May 17, 2024
Homeराज्यपुण्यात शिवसैनिकांकडून आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड

पुण्यात शिवसैनिकांकडून आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड

पुणे : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्याने राज्यभरात शिवसेना आक्रमक झालेली पहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची काही शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार तानाजी सावंत यांनी बंड केल्याने आणि ते देखील आसामला गेल्याने आक्रमक शिवसैनिकांनी शिवसेनेचा झेंडा हातात घेऊन तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. पुण्यातील बालाजी नगर परिसरातील हे कार्यालय फोडले आहे. या घटनेनंतर तानाजी सावंत यांच्या कात्रज येथील मुख्य कार्यालय आणि घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. यावेळी गद्दार सावंत असे कार्यालयाच्या काचांवर लिहून कार्यालयाच्या काचा फोडल्या. यावेळी तानाजी सावंत त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.

पुण्यातील एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिदे यांच्या तर्फे उभारण्यात आलेल्या वैद्यकीय मदत कक्षाच्या बोर्डाला देखील शिवसैनिकांनी काळे फासण्यात आले. पुण्यातील सदाशिव पेठेत हे कार्यालय आहे. हे कार्यालय देखील शिवसैनिकांकडून फोडण्यात आले आहे.

तानाजी सावंत हे मूळ सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील आहेत. त्यांनी 2015 मध्ये राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत दाखल झाले. खासगी साखरसम्राट आणि शिक्षणसम्राट अशी त्यांची ओळख आहे. शिवसेनेकडून दोनवेळा निवडणूक लढवली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय