Sunday, May 19, 2024
HomeNewsब्रेकिंग : शिवसेना आमदारांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय

ब्रेकिंग : शिवसेना आमदारांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय

मुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यभरात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. अनेक ठिकाणी शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात येत आहे. त्यांच्या फ्लेक्सला काळं फासले जात आहेत. अशात आता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी काल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांनी मुंबई पोलिस दलातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन कायदा आणि सुव्यवस्थेविषयी चर्चा केली. त्यानंतर राज्यातील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून १० जुलैपर्यंत मुंबईत कलम १४४ म्हणजेच जमावबंदी लागू असणार आहे. त्यामुळे चार किंवा चारपेक्षा अधिक लोकांना एकत्र जमता येणार नाही. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी परिपत्रक जारी केलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत, शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांच्या कार्यालये फोडले जात असल्याने हा निर्णय घेतला आहे.

मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या सुचना

  • मुंबईतील सर्व राजकीय पक्षांचे कार्यालय, मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवकांच्या कार्यालयाबाहेर बंदोस्ताच्या सूचना
  • स्थानिक राजकीय व्यक्तींसोबत समन्वय ठेवून आगाऊ माहिती काढण्याच्या सूचना
  • सध्या चालू असलेले राजकीय कार्यक्रम बैठका इत्यादी ठिकाणी योग्य बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना
  • सोशल मीडियावर लक्ष ठेवून संबंधितांना आवश्यक माहिती त्वरित देण्याचे आदेश
  • स्थानिक ठिकाणी संभाव्य राजकीय हालचालींबाबत माहिती घेऊनय योग्य कारवाई करण्याचे आदेश
  • कोणताही राजकीय पक्ष कायदा हातात घेणार नाही, तोडफोड करणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश
  • कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह पोस्टर, बॅनर लागणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय