Friday, May 17, 2024
Homeराजकारणशिवसेनेच्या कारवाई विरोधात शिंदे गट सुप्रीम कोर्टात, आज होणार सुनावणी

शिवसेनेच्या कारवाई विरोधात शिंदे गट सुप्रीम कोर्टात, आज होणार सुनावणी

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसापासून राजकीय संघर्ष सुरू आहे. नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड पुकारले आहे, त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. आता शिवसेनेने देखील आमदारांविरोधात कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

शिवसेनेकडून शिंदे गटातील १६ आमदारांवर निलंबनाची कारवाई कारवाई करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे, अशात शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्याची माहिती आहे. यामुळे आता शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा सामना कोर्टात रंगणार आहे. आज सकाळी १०.३० वाजता सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदे यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. ही सुनावणी जस्टीस सूर्यकांत आणि जस्टीस पारडीवाला यांच्या बेंच समोर होणार आहे.

विधानसभा उपाध्यक्ष यांनी शिंदे गटाच्या १६ आमदारांना केलेल्या निलंबनाच्या आणि शिवसेनेनं नियुक्त केलेल्या गटनेत्या विरोधात याचिका दाखल केली आहे. या सुनावणीत बंडखोरी केलेल्या आमदारांच्याकडून ज्येष्ठ वकील हरीश साळवे बाजू मांडणार आहेत. तसेच शिवसनेकडून ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करणार आहेत. त्यामुळे सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय