Thursday, May 2, 2024
Homeजिल्हानाशिक : राजर्षी शाहू महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन ! 

नाशिक : राजर्षी शाहू महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन ! 

नाशिक : दि.२६ जून २०२२ रोजी सकाळी १०.३० वा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नाशिक कोर्ट इमारती समोर, नाशिक राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी समितीच्या वतीने जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज सि बी एस येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला माजी खासदार प्रताप वाघ यांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आला. 

कार्यक्रम चे प्रास्ताविक प्रभाकर धात्रक यांनी केले. राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा गौरव प्रताप वाघ यांनी मार्गदर्शन करताना केला. शाहू महाराज यांनी नाशिक येथे उदोजी बोर्डिंग, वंजारी बोर्डिंग, शाहू बोर्डिंग ला मदत त्या काळी केली. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षण शिक्षण घेऊ शकले आहेत. वसतिगृह सर्व समाजासाठी उभारून शाहू महाराज यांनी महात्मा फुले यांचा विचार कृतीशील कार्यातून पुढे नेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण साठी मदत  करून महत्त्वाचे योगदान दिले आहे.  दूरदृष्टी चा राजाला नमन करतो. व हे वर्ष स्मृती शताब्दी वर्ष आहे. नाशिक शहरात स्थापन झालेल्या शाहू महाराज स्मृती शताब्दी समिती वतीने होणाऱ्या कार्यक्रम मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व स्मृती शताब्दी समितीचे अध्यक्ष राजू देसले यांनी लोकराजा शाहू महाराज यांचे विचार व कार्य तरुण पिढी ला माहिती होण्यासाठी जाणीवपूर्वक वर्ष भर विविध उपक्रम व्याख्यान, स्पर्धा, रॅली आयोजित करण्यात येणार आहेत. यात जनतेने व विद्यार्थी युवकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करत लोकराजा शाहू महाराज यांच्या विचारांची आज समाजाला अत्यंत गरज आहे. समतेचा विचार सांगणाऱ्या, व कृतिशील राजाला अभिवादन केले. 

या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला करूणासागर पगारे  यांनी हार अर्पण केला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा ला ऍड नाजीम काझी, संजय करंजकर यांनी हार अर्पण केले.

या प्रसंगी मनोगत माजी खासदार प्रताप वाघ, ग. पां. माने, तानाजी जायभावे, अलका एकबोटे, विराज देवांग,  बाळासाहेब गाभने, करणं गायकर,राकेश वानखेडे, संदीप पागेरे,चेतन पनेर, चंद्रकांत गायकवाड, चारुदत्त म्हसदे, समितीचे अध्यक्ष राजू देसले, सरचिटणीस जयवंत खडताळे, उपाध्यक्ष ॲड. प्रकाश काळे, ॲड. नाझीम काजी, प्रफुल्ल वाघ, सहसचिव डॉ.अनिल आठवले, खजिनदार प्रभाकर धात्रक, व्ही. टी. जाधव, कार्यकारणी सदस्य व्ही. टी. जाधव, करूणासागर पगारे, प्रा.एस.के.शिंदे, चंद्रकांत गायकवाड, प्रल्हाद मिस्त्री, वसंत एकबोटे, सोमनाथ मुठाळ, संजय करंजकर, निशिकांत पगारे, गौरव जगताप, अविनाश आहेर, विजय राऊत, ॲड. समीर शिंदे, ॲड. तातेराव जाधव, शिवदास म्हसदे, विजय राऊत, निशिकांत पगारे, कुणाल गायकवाड, अरुण घोडेराव, तल्हा शेख, ॲड. प्रभाकर वायचळे, सागर निकम, निलेश राठोड, राजू म्हसदे, प्राजक्ता कापडणे, कैवल्य, जयवंत विजय पुष्प, वसंत एकबोटे, विलास कांबळे, गजानन निकाळजे, रवींद्र सुरवसे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन जयवंत खडताळे सचिव यांनी केले. आभार शिवदास म्हसदे यांनी मानले. राजर्षी शाहू महाराज स्मृती समितीच्या वतीने दिनांक 27 जून सोमवारी सायंकाळी 5:30 वा. राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य व आजची परिस्थिती या विषयावर इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान मु श. औरंगाबाद सभागृह नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रसंगी व्ही. एन. नाईक शिक्षण संस्था व शाहू बोर्डिंग संस्थेचा सन्मान करण्यात येणार आहे. तरी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन लोकराजा शाहू महाराज स्मृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय