Friday, April 19, 2024
Homeआंबेगावघोडेगाव : तळेघर येथे करिअर मार्गदर्शन मेळाव्यास प्रतिसाद 

घोडेगाव : तळेघर येथे करिअर मार्गदर्शन मेळाव्यास प्रतिसाद 

घोडेगाव : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) आंबेगाव तालुका समितीने नुकतेच इयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शिवशंकर विद्यालय, तळेघर येथे करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करिअर च्या संधी माहिती झाल्या पाहिजेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी देखील चांगल्या शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेतले पाहिजे, त्यांना शाखा निवड व भविष्यातील करिअर च्या संधी माहिती व्हाव्यात यासाठी करिअर मार्गदर्शन महत्वाचे आहे, हे ओळखून  या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 

या करिअर मार्गदर्शन मेळाव्यात प्रतिभा कॉलेज चिंचवड येथील प्रा.मनिष पाटणकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना ‘भविष्यातील करिअर च्या संधी व त्यासाठी कसा अभ्यास करावा, शाखा निवड कशी करावी?’ यावर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे आयोजन शहीद राजगुरू ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय, फलोदे व एस.एफ.आय.आंबेगाव तालुका समितीने केले होते. तसेच हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी माजी नायब तहसीलदार विजय केंगले यांनी विशेष प्रयत्न केले.

या मेळाव्यात तळेघर व परिसरातील शाळा, महाविद्यालयातील सुमारे १०० पेक्षा अधिक विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थिती होते. यावेळी शिवशंकर महाविद्यालय, तळेघर चे मुख्याध्यापक बी.डी.कवडे व एस.पी.जोशी, शासकीय आश्रम शाळा, राजपूर चे भागवत सर,  एस.एफ.आय.चे तालुका अध्यक्ष दिपक वाळकोळी, सहसचिव हरिदास घोडे, उपाध्यक्ष रोशन पेकारी, कोषाध्यक्ष रोहिदास फलके व किसान सभेचे मच्छिंद्र वाघमारे हेही उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शहीद राजगुरू ग्रंथालयाचे अशोक जोशी व आभार बाळू काठे यांनी मांडले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय