Friday, April 26, 2024
Homeराजकारणसुप्रिया सुळे यांचा तो फोटो शेअर करणे शिंदे गटाच्या महिला नेत्याला महागात,...

सुप्रिया सुळे यांचा तो फोटो शेअर करणे शिंदे गटाच्या महिला नेत्याला महागात, त्यांच्याविरोधात तक्रार दाखल

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा राष्ट्रवादीकडून शुक्रवारी एक फोटो ट्विट करण्यात आला होता. या फोटो मध्ये मुख्यमंत्र्यांच्या खूर्चीवर खासदार श्रीकांत शिंदे बसल्याचे दिसत आहे. या फोटोवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले होते. या फोटोनंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांचा देखील एक फोटो व्हायरल झाला आहे.

शिंदे गटातील शितल म्हात्रें यांनी शुक्रवारी रात्री एक फोटो ट्विटरवर शेअर केला. त्या फोटोत मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर सुप्रिया सुळे बसलेल्या दिसत असून त्यांच्या बाजूला तत्कालिन आरोग्य मंत्री राजेश टोपे व तत्कालिन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे बाजूला बसलेले दिसत आहेत. या फोटो सोबत त्यांनी ‘हा फोटो बघा.. कोण कोणाच्या खुर्चीवर बसलयं ??’ असे म्हटले आहे. या फोटोवरून नेटकऱ्यांनी शीतल म्हात्रे यांना ट्रोल केले आहे.

शितल म्हात्रें यांनी हा फोटो ट्वीट केल्यानंतर म्हात्रें यांनी शेअर केलेला फोटो मॉर्फ केलेला असल्याचे समोर आले आहे. या फोटोवरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून शीतल म्हात्रेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, शीतल म्हात्रे यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतर सुप्रिया सुळेंच्या या फोटो संदर्भात मी कोणताही दावा केलेला नाही तर प्रश्न विचारलाय, असे स्पष्टीकरण दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश भरात तपासे यांनी देखील सुप्रिया सुळेंचा ओरिजनल फोटो व मॉर्फ केलेला फोटो शेअर केला आहे. सोबत त्यांनी शिंदे गटावर टीका देखील केली आहे. ‘दुसऱ्या कोणाच्याही खुर्चीवर बसण्याची परंपरा पवार घराण्याची किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाही. दुसऱ्याची खुर्ची खेचून त्याच्यावर बसण्याची संस्कृती कोणाची आहे हे सबंध महाराष्ट्राला माहित आहे.’ अशी टीका महेश तपासे यांनी केली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय