पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : चिंचवड शाहूनगर येथील आधार महिला मंडळ अध्यक्षा सुप्रिया चांदगुडे यांच्या नेतृत्वाखाली आषाढी एकादशी निमित्त लहान मुले, माताभगिनी, जेष्ठ नागरिकांची पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विठुरायाचे नामस्मरण व हरिनामाचा गजर करत परिसरातील शेकडो नागरिक दिंडीत सामील झाले.
यामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. महिलांनी फुगडी घालत दिंडीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले. डोक्यावर तुळशी पत्र, टाळ – मृदंगाच्या साथीवर ठेका धरत सामूहिक नृत्य देखील केले. अबाल वृद्धांनी देखील साथ देत दिंडीची शोभा वाढवली. दिंडीच्या सुरुवातीला भगवा ध्वज त्यामागे टाळकरी आणि वारकरी अशी दिंडीची रचना होती.
या कार्यक्रमाचे आयोजन आधार महिला मंडळाच्या संस्थापिका सुप्रियाताई चांदगुडे, स्वाती शहाणे, अश्विनी तोरखडे, रत्नमाला कदम, स्वाती गायकवाड, मीनल दीक्षित, आशा मेटांगे, दिपाली करंजकर, स्नेहल चांदगुडे आदी आधार महिला मंडळ सदस्यांनी केले.
‘ट्रॅक कंपोनन्ट्स’च्या कामगारांना तब्बल साडेबारा हजारांची वेतनवाढ !
ज्येष्ठ नागरिक त्रिवेणीनगर संघाचा 14 वा वर्धापन दिन संपन्न
संभाजी ब्रिगेडच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन