मुंबई : अभिनेता शाहरुख खानच्या बहुचर्चीत असलेल्या ‘जवान’चा प्रिव्ह्यू आज रिलीज करण्यात आला आहे. शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाच्या टीझरची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. अखेर आज या चित्रपटाचा प्रिव्ह्यू रिलिज करण्यात आला. या प्रिव्ह्यूने चाहत्यांचे होश उडवले असून सोशल मीडियावर चाहते चित्रपटाला ब्लॉकबस्टर म्हणायला लागले आहेत.
अभिनेता शाहरुख खानने चार वर्षांच्या ब्रेकनंतर ‘पठाण’ चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले आणि हा चित्रपट सुपर ब्लॉक बस्टर ठरला. यानंतर आता किंग खानच्या आगामी ‘जवान’ या चित्रपटाचा प्रिव्ह्यू सोमवारी, 10 जुलै रोजी म्हणजेच आज या चित्रपटाचे पूर्वावलोकन रिलीज करण्यात आले आहे.
प्रिव्ह्यूमध्ये, शाहरुख खान अतिशय उग्र अवतारात दिसत आहे. शाहरुख खान एका सीनमध्ये त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावरील बँडेज उघडताना दिसत आहे आणि नंतर जेव्हा त्याचा टक्कल झालेला दिसतो आहे. यासोबतच दीपिका पदुकोणची अॅक्शन आणि नयनतारा पोलिस ऑफिसरच्या भूमिकेतही झलक आहे. तसेच प्रियामणि, सुनील ग्रोवर आणि विजय सेतुपतिदेखील दिसत आहेत. हा चित्रपट जवळपास २२० कोटी बजेटमध्ये तयार झाला आहे. ॲटलीने हा चित्रपट दिग्दर्शित केला असून गौरी खानची निर्मिती आहे.
याआधी चित्रपटाच्या पोस्टर्सने धुमाकूळ घातला होता. ‘जवान’ ७ सप्टेंबर रोजी थिएटर्समध्ये रिलीज होईल.
हे ही वाचा :
ब्रेकिंग : १२ आमदारांबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
खळबळजनक : ऑनलाइन जंगली रमी हरल्याने पुण्यात तरूणाची आत्महत्या
ऐकावे ते नवलच : टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दुकानावर चक्क बाऊन्सर तैनात
टोमॅटोने मोडले आता पर्यतचे पेट्रोल डिझेलचे सर्व रेकॉर्ड, अनेक शहरांत टोमॅटो 150 पार
ऑनलाईन गेम खेळताना प्रेम जडलं, 4 मुलांची आई प्रियकरासाठी थेट पाकिस्तानातून भारतात
अखेर ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या लेखकाने मागितली प्रेक्षकांची जाहीर माफी
धक्कादायक : मंत्र्यांच्या स्वागतासाठी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना तब्बल दोन तास रस्त्यावर केले उभे