मुंबई : राज्य सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते प्रदान करण्यासाठी तसेच सार्वजनिक उपक्रम आणि महामंडळांच्या निधी गुंतवणुकीसाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (Mumbai District Central Cooperative Bank) खाते उघडण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली. या बैठकीचे अध्यक्षस्थान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूषविले. (Mumbai)
२०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्यांसाठी संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना खाते उघडण्याची परवानगी देण्यात आली. तसेच निवृत्तीवेतनधारकांची वैयक्तिक बँक खाती उघडण्यासाठी आणि सार्वजनिक उपक्रम व महामंडळांचा अतिरिक्त निधी गुंतवणुकीसाठी बँकेस अधिकृत करण्यात आले आहे.
Mumbai District Central Cooperative Bank
या निर्णयामुळे शासकीय व्यवहार सुलभ आणि पारदर्शक होण्यास मदत होईल.
हे ही वाचा :
नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कंडोमपासून आलू भुजियापर्यंत ऑनलाईन विक्रमी खरेदी, यादी एकदा वाचाच !
‘डॉक्टरांनी केले मृत घोषित, रूग्ण आला घरी चालत’ या अजब घटनेची जोरदार चर्चा
पुणे मेट्रो फेज 2 मध्ये सात नवीन मार्गांचा समावेश
अभिनेता दिलीप शंकर यांचे निधन, हॉटेलच्या खोलीत आढळला मृतदेह
मोठी बातमी : पुजाऱ्यांना मिळणार दरमहा 18,000 सन्मान निधी
मोठी बातमी : विमानाचा भीषण अपघात, 42 जणांच्या मृत्यूची शक्यता