तलासरी : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)चे ५ वे ठाणे – पालघर (Thane – Palghar) जिल्हा अधिवेशन नुकतेच संपन्न झाले. दिनांक १६-१७ मार्च २०२४ रोजी कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर भवन, तलासरी येथे हे दोन दिवशीय अधिवेशन भरवण्यात आले होते. अधिवेशनाची सुरुवात एसएफआयचे ध्वज फडकावून करण्यात आली. अधिवेशनाच्या मंचाला कॉम्रेड बारक्या मांगत मंच, सभागृहाला कॉम्रेड कमल वानले यांचे तर परिसराला कॉम्रेड रतन बुधर नगर असे नाव दिले गेले होते.
अधिवेशनाचे उद्घाटन किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड किरण गहला यांनी केले. अधिवेशनास एसएफआयचे गुजरात राज्य सचिव व केंद्रीय कमिटी सदस्य नितीश मोहन, महाराष्ट्र राज्य सचिव रोहिदास जाधव, राज्य उपाध्यक्ष व जिल्हा सचिव भास्कर म्हसे, राज्य कमिटी सदस्य अशोक शेरकर, माजी नेत्या नीलिमा धनगर यांनी मार्गदर्शन केले. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष नितीन कानल हे होते. अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रासाठी ३५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
त्यानंतर अधिवेशनाच्या प्रतिनिधी सत्राला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या अध्यक्ष मंडळाचे कामकाज नितीन कानल, अशोक शेरकर, अंकिता धोडी यांनी तर संचालन कमिटीचे कामकाज भास्कर म्हसे, गीता दौडा यांनी केले. भास्कर म्हसे यांनी ‘एसएफआयच्या मागील कार्याचा, जिल्ह्यातील शैक्षणिक, राजकीय, सामाजिक परिस्थितीचा आढावा घेणारा अहवाल’ मांडला. त्यावर प्रतिनिधींनी तालुकानिहाय गटचर्चा केली व त्यानंतर प्रतिनिधींनी त्यावर आपले मत व्यक्त केले. त्यानंतर सर्वानुमते अहवाल संमत करण्यात आला. (Thane – Palghar)
अधिवेशनातील ठराव
अधिवेशनात पुढील ठराव घेण्यात आले. (१) जिल्हा परिषदेच्या शाळा दत्तक देण्याचा व २०पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा सरकारचा डाव हाणून पाडा. (२) नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा. (३) विद्यार्थिनी व महीला अत्याचार विरोधात लढा तीव्र करा. (४) आदिवासी ग्रामीण भागातील बस व्यवस्था सुरळीत करा व विद्यार्थ्यांना मोफत बस पास द्या. (५) महागाईनुसार शिष्यवृत्तीमध्ये वाढ करा. (६) शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी तीव्र लढा उभा करा. यासहीत विविध ठराव यामध्ये एकमताने पारित करण्यात आले.
नवीन जिल्हा कमिटीची निवड
या अधिवेशनात २१ सदस्यांची एसएफआयची नवीन ठाणे – पालघर (Thane – Palghar) जिल्हा कमिटी निवडण्यात आली. त्यामध्ये जिल्हा अध्यक्ष म्हणून भास्कर म्हसे यांची तर जिल्हा सचिव म्हणून गीता दौडा यांची एकमताने निवड करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्ष म्हणून अंकिता धोडी, राहुल बी. भोये, जिल्हा सहसचिव म्हणून नितीन कानल, राहुल जे. भोये आणि सचिवमंडळ सदस्य म्हणून करण वळंबा यांची निवड करण्यात आली.
जिल्हा कमिटी सदस्य म्हणून देविदास कुरकुटे, स्वप्नील कुवरा, मनान शेख, संगीता गौतम, सिद्दी सुरती, संतोष कोम, अजित गायकवाड, करुणा फडवले, पूजा कामडी, सुवर्णा सुतार, श्वेता कोम, हृतिक मोहरा, विवेक वळंबा, वीरेंद्र दुमाडा यांची निवड करण्यात आली आहे. नवीन २१ सदस्यांच्या जिल्हा कमिटीत ८ मुलींचा समावेश आहे.
एसएफआयच्या नवनिर्वाचित ठाणे – पालघर (Thane – Palghar) जिल्हा कमिटीचे नेतृत्व व सर्व नव्याने निवड झालेल्या सदस्यांचे उपस्थित वरिष्ठ नेतृत्वाने स्वागत केले. या अधिवेशनात जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील विद्यार्थी प्रतिनिधी सहभागी झाले होते. अधिवेशनाचा समारोप ‘हम होंगे कामयाब’ या स्फूर्तीदायी गीताने करण्यात आला.
हे ही वाचा :
मी पुन्हा आलो पण येताना दोन्ही पक्ष फोडूनच आलो देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य
ब्रेकिंग : शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीवर हल्ला
धक्कादायक : पुण्यात दिवसाढवळ्या गोळीबार, एकाचा मृत्यू
Pune : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे अंतर्गत भरती
कळपातून उधळलेला बैल थेट कारमध्येच घुसला; नंदुरबारमधील घटना
जुन्नर : मुलीच्या बालविवाह प्रकरणी आई-वडिल, नवरदेव, सासु-सासरे, भटजीसह 8 जणांवर गुन्हा
राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेची आज सांगता सभा
अधिसूचना ते मतमोजणी लोकसभा निवडणुकीचे संपुर्ण वेळापत्रक