Sunday, May 19, 2024
Homeजिल्हाSFI चे एक दिवशीय तलासरी तालुका अभ्यास शिबिर संपन्न! 

SFI चे एक दिवशीय तलासरी तालुका अभ्यास शिबिर संपन्न! 

तलासरी : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) चे एक दिवशीय तलासरी अभ्यास शिबिर कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर भवन, तलासरी, जि. पालघर येथे घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन किसान सभेचे जेष्ठ नेते तथा माजी खासदार व माजी आमदार कॉम्रेड लहाणू कोम यांनी केले. यावेळी एसएफआयचे राज्य अध्यक्ष व केंद्रीय कमिटी सदस्य सोमनाथ निर्मळ, राज्य उपाध्यक्ष व जिल्हा सचिव भास्कर म्हसे, राज्य कमिटी सदस्य व जिल्हा अध्यक्ष नितीन कानल, राज्य कमिटी सदस्य अशोक शेरकर यांच्यासह जिल्हा सचिवमंडळाचे सदस्य उपस्थित होते.

शिबिराच्या पहिल्या सत्रात एसएफआयचे राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ यांनी ‘एसएफआयची घटना व कार्यक्रम’ तसेच ‘संघटना बांधणी’ या विषयावर मांडणी केली. 

शिबिराच्या दुसऱ्या सत्रात एसएफआयचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष, माजी राज्य सरचिटणीस व अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉम्रेड डॉ. अशोक ढवळे यांनी ‘कॉम्रेड गोदावरी परुळेकर व कॉम्रेड शामराव परुळेकर यांचे ऐतिहासिक वारली आदिवासी उठावातील कार्य आणि आजच्या आदिवासी जनतेचे ज्वलंत प्रश्न’ या विषयावर मार्गदर्शन केले.

दुसऱ्या सत्रात एसएफआयच्या माजी राज्य सरचिटणीस व अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय महासचिव कॉम्रेड मरियम ढवळे यांनी ‘महिला चळवळ आणि मुलींचे शिक्षण’ या विषयावर मांडणी केली.

तसेच कामगार नेते व डहाणू विधान सभेचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी मार्गदर्शन करून एसएफआयच्या आगामी कार्याला शुभेच्छा दिल्या.

एसएफआयचे राज्य उपाध्यक्ष व जिल्हा सचिव भास्कर म्हसे, राज्य कमिटी सदस्य व जिल्हा अध्यक्ष नितीन कानल यांनी जिल्ह्यातील एसएफआयचे आगामी नियोजन मांडले. हे सर्व नियोजन यशस्वी करण्याचा निर्धार करून एसएफआयच्या जोरदार घोषणा देऊन शिबिराचा समारोप करण्यात आला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय