आळेफाटा : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यलक्षी संचालकपदी कामगार युनियनचे माजी उपाअध्यक्ष बाळकृष्ण सखाराम चाळक यांची निवड करण्यात आली आहे.
श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने वेतनवाढी संदर्भात विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिलदादा शेरकर यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची गुरूवारी ( दि २) बैठक घेण्यात आली.
यावेळी बोलताना विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर म्हणाले की, कारखान्यातील कायम कामगारांमधून एक कार्यलक्षी संचालक नियुक् करावयाचा असतो. या पदासाठी सर्व कामगार अधिकारी व संचालक मंडळाने एकमुखाने शिफारस केल्यामुळे ज्येष्ठ कर्मचारी व मिलफोरमन बाळकृष्ण सखाराम चाळक यांची कार्यलक्षी संचालक पदावर एकमताने निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे चाळक यांना संचालक म्हणून कामगारांचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. तसेच कामगार युनियनच्या सभेत राजेश सोपान कुर्हे यांची कामगार युनियनचे अध्यक्षपदी निवड झाली आहे. या दोघांचा संचालक मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.