पालघर : ठाणे पालघर जिल्ह्यात नव्यानेच सुरू झालेल्या शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीने आज दि. 5 जुलै रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर एक जोरदार मोर्चा काढण्यात आला. (Palghar)
कर्मचार्यांना मिळणारे तुटपुंजे मानधन, विना चौकशी कामावरून काढणे, पुरेसा शिधा न पुरवणे, स्वयंपाका व्यतिरिक्त इतर अनेक कामे करून घेणे अशा अनेक समस्यांनी हे कर्मचारी मेटाकुटीला आले आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताच किमान 50 कर्मचार्यांना काहीही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकले. त्यामुळे संतापून सर्व पोषण कर्मचाऱ्यांनी सीटूच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. (Palghar)
सुमारे 1200 कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. सीटूचे नेते आमदार विनोद निकोले यांच्या मध्यस्थीने जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब शिष्टमंडळाला चर्चेला बोलावले. काढून टाकलेल्या सर्व कर्मचार्यांना त्वरित कामावर घेतले जाईल या प्रमुख मागणीसह इतरही स्थानिक मागण्या त्वरित मान्य झाल्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांत जोश निर्माण झाला आहे.
मोर्चाचे नेतृत्व आमदार विनोद निकोले, किरण गहला, सुनीता शिंगडा, रामचंद्र बरफ, चंद्रकांत घोरखाना, प्राची हातिवलेकर, सुरेश जाधव इत्यादींनी केले.
हेही वाचा :
मेंदू खाणाऱ्या अमिबाने 14 वर्षांच्या मुलाचा घेतला जीव
रिलसाठी स्टंट करताना दुचाकीवरून तरुणाचा भीषण अपघात, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल
जगातील पहिली CNG बाईक प्रदूषणमुक्त भारत ध्येय साध्य करेल – नितीन गडकरी
नाणेघाट : इतिहासाची आणि नैसर्गिक सौंदर्याची संगमभूमी
मोठी भरती : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत भरती; पगार 64480 पर्यंत
ब्रेकिंग : मुख्याध्यापक नियुक्तीसाठी पटसंख्येचा निकष बदलणार ?
गावठी दारू तयार करणाऱ्या १० हातभट्ट्यांवर छापा; २ लाख १७ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त
AIASL मार्फत विविध पदांच्या 3256 जागांसाठी मेगा भरती
ब्रेकिंग : महाराष्ट्रातील झिका विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक नियमावली जाहीर
धक्कादायक! अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने कॉलेजच्या टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म