Monday, May 6, 2024
Homeग्रामीणपुणे शिक्षक मतदारसंघातील अभ्यासू, प्रामाणिक उमेदवार प्रा. डॉ. सुभाष जाधव; शिक्षण, प्राध्यापकांंचा...

पुणे शिक्षक मतदारसंघातील अभ्यासू, प्रामाणिक उमेदवार प्रा. डॉ. सुभाष जाधव; शिक्षण, प्राध्यापकांंचा आवाज बुलंद करणार!

कोल्हापूर : सन २०२० मध्ये येऊन घातलेल्या पुणे शिक्षक मतदारसंघात सामाजिक चळवळीचे, अभ्यासू, प्रामाणिक, शिक्षक – प्राध्यापकांचे प्रश्न हेरारीने मांडणारे प्रा. डॉ. सुभाष आत्माराम जाधव हे उभे आहे.

पुरोगामी शिक्षक संघटना, प्राध्यापक संघटनांंचा पाठिंबा असलेले ते चर्चेत असलेले एकमेव उमेदार पहावयाच मिळत आहे. विद्यार्थी चळवळ, शिक्षक प्राध्यापक चळवळ, शिक्षण हक्क चळवळ, कामगार चळवळ अशा विविध क्षेत्रात प्रामाणिक आणि तळागाळातील जनतेला न्याय देण्यासाठी आयुष्यभर झटणारे उमेदवार म्हणून सध्या चर्चेत आहे.

शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा असल्यामुळे ते आघाडीवरचे उमेदवार ठरणार, अशी चर्चा रंगत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात नाही, महाराष्ट्राभर ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर लढणारे प्रा. जाधव यांना विधानपरिषदेत पाठविण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, कामगार एकजूट झाल्याचे दिसते. प्रा. डॉ. सुभाष जाधव यांची अभ्यासू वृत्ती, प्रखड मांडणी, आणि अर्थशास्त्राचे अभ्यासक या मुळे त्यांना शिक्षण क्षेत्रातील मुळ समजले आहे. त्यांचे विचार जनसामान्यांना भावणारे आहे. 

प्रामाणिकपणाचे हत्यार घेऊन शिक्षक – प्राध्यापकांना न्याय देण्यासाठी ते निवडणूकीत उतरले असल्याचे त्यांनी ‘महाराष्ट्र जनभूमी’ बोलताना सांगितले.

ते पुढे म्हणाले, ‘विधान परिषदेचा आदर्श आमदार कसा असला पाहिजे, याचा वस्तुपाठ प्रा. बी. टी. देशमुख (भाऊ) यांनी घालून दिला आहे. तो वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी आणि शिक्षक – प्राध्यापकांचे प्रश्न विधानपरिषदेत मांडण्यासाठी आणि वेळ आली तर रस्त्यावरची लढाई करु, या उद्देशाने मी या निवडणुकीकडे पहात आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय