Sunday, May 19, 2024
Homeग्रामीणअल्पसंख्यक विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा - इस्माईल जी पटेल

अल्पसंख्यक विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा – इस्माईल जी पटेल


लातूर : केंद्रीय अल्पसंख्यक मंत्रलाय मान्यता प्राप्त मौलाना आझाद एज्युकेशन फाउंडेशनद्वारे अल्पसंख्यक मुलींना बेगम हजरत महल शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज मागवीने सुरु आहे.अल्पसंख्यक मुलींना या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस निलंगा तालुकाध्यक्ष ईस्माइल जी पटेल यांनी केले आहे.

मुस्लिम, बौद्ध, शिख, पारशी, जैन व ख्रिश्चन समाजातील मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत म्हणून हजरत बेगम महल शिष्यवृत्ती दिली जाते. ९ ते १२ वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती अंतर्गत इ. ९ वी व इ. १० वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना वार्षिक ५,००० रुपये तसेच इ. ११ वी व १२ वी शिकणाऱ्या विद्यार्थिनींना ६,००० रुपयांची वार्षिक मदत दिली जाते.

शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज मागवणे सुरु आहे,अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२० आहे. अर्ज दाखल करण्यासाठी संबंधित संकेत स्थळावर भेट द्यावी किंवा आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय