Thursday, November 21, 2024
HomeहवामानSatara : सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस; कोयना धरणात प्रतिसेकंद ४३ हजार...

Satara : सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस; कोयना धरणात प्रतिसेकंद ४३ हजार क्युसेक्स पाण्याची आवक

महाबळेश्वर सर्वाधिक पाऊस – ७८.३ (१३२१.१) (Satara)


सातारा : गुरूवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मागील २४ तासात कोयना महाबळेश्वर परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. कोयना धरण परिसरात १०० मिलिमिटर पाऊस तर महाबळेश्वर परिसरात ९५ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. सातारा, कराड, वाई, कोरेगाव आदी परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. (Satara)

कोयना पाणलोट क्षेत्रात धरणात वेगाने पाणी येत आहे. कोयना धरणात ४८ टीएमसी पाणीसाठा आहे. कोयना धरणात प्रतिसेकंदाला ४३ हजार क्युसेक्स पाण्याची आवक सुरु आहे.
कोयना येथे ८६ मिमी पाऊस झाला. नवजा येथे ११६ तर महाबळेश्वर येथे ७१ मिमी पाऊस झाला. गुरूवारी सकाळच्या सुमारास सुमारे २१ हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते. (Satara)

सातारा जिल्ह्यातील संपूर्ण जुन जुलै महिन्याची तालुकानिहाय आकडेवारी मिमी खालील प्रमाणे आहे. (Satara)


सातारा – १३.३ (३७१), जावली-मेढा – ३२.२ (६४१.२), पाटण – २६.४ (६१६.८), कराड – ११.७ (३९३.१), कोरेगाव -६.५ (३३२.४), खटाव – वडूज – ६.७ (३०१.९), माण – दहिवडी – २.० (२४९.४), फलटण – ०.७ (२७७.५), खंडाळा – ३.४ (१७४.६), वाई – ११.० (३३४.६), महाबळेश्वर – ७८.३ (१३२१.१) या प्रमाणे पाऊस झाला आहे. (Satara)

कोयना धरण
दिनांक: २०/०७/२०२४
कोयना धरण साठा
एकूण: ५०.७६ टीएमसी (४८.२३%)
उपयुक्त साठा – ४५.६४ टीएमसी (५४.५८%)
धरणात आवक – ४२ हजार ९९१ क्युसेक

संबंधित लेख

लोकप्रिय