Wednesday, February 19, 2025

Free training : मिरज शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण संस्थेतर्फे मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षण

मुंबई, दि.१९ : दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे व जिल्हा परिषद, सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र, मिरज या संस्थेमार्फत सन 2024-2025 या वर्षांसाठी संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षणासाठी दिव्यांग व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, असे अधीक्षक, शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, मिरज, ता. मिरज, जि. सांगली यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. (Free training)

या संस्थेतील प्रशिक्षण वर्गांना महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, मुंबई यांची मान्यता आहे. या संस्थेला अखिल भारतीय स्तरावरील फिक्की ॲवॉर्ड 1999 हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. (Free training)

या संस्थेमार्फत किमान ८ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऑपरेशन वुईथ एम.एस. ऑफिस (संगणक अभ्यासक्रम) आणि किमान ९ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मोटार ॲण्ड आर्मेचर रिवायडिंग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज (इलेक्ट्रीक कोर्स) करिता प्रवेश दिला जातो. (Free training)

प्रशिक्षणासाठी वयोमर्यादा 16 ते 40 वर्षे आहे. प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा असून प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय राहील. अद्ययावत परिपूर्ण संगणक कार्यशाळा, व्यवसायाभिमुख प्रशिक्षण, नेटवर्किंग व इंटरनेट आणि मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध आहे. प्रशिक्षणार्थींना समाजकल्याण विभागामार्फत स्वयंरोजगारासाठी बीजभांडवल योजनेचा लाभ देण्यात येईल. (Free training)

प्रवेशासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नसून प्रवेश अर्ज परिपूर्ण भरून छायाचित्रासह संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरून द्यावेत. प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, दिव्यांगत्व असल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला व आधार कार्ड यांच्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात. प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर तज्ज्ञ समितीद्वारे मुलाखती घेऊन प्रवेश देण्यात येईल. (Free training)

प्रवेश अर्ज व अधिक माहितीसाठी अधीक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळ्याजवळ, ता. मिरज, जि. सांगली- 416410 (दूरध्वनी क्रमांक 0233-2222908, 99225 – 77561, 95956-67936) येथे संपर्क साधावा. जास्तीत जास्त दिव्यांगानी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles