पुणे : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित मास्टरमाईंड वाल्मिक कराड (Valmik Karad) याने अखेर आज पुणे सीआयडी अधिकाऱ्यांसमोर शरणागती पत्करली. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे तापलेल्या राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथीनंतर कराडने हे पाऊल उचलले आहे.
वाल्मिक कराड शरण (Valmik Karad surrenders) येण्यापूर्वी त्याचा एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यामुळे प्रकरण पुन्हा चर्चेत आले. कराडवर विरोधकांनी टीकास्त्र सोडत त्याला मंत्री मुंडेंचा निकटवर्तीय असल्याचा आरोप केला होता. संतोष देशमुख हत्या प्रकरण तापल्यानंतर कराड अचानक गायब झाला होता. सीआयडीने त्याचा कसून शोध घेतला आणि अखेर तो सीआयडी अधिकाऱ्यांसमोर हजर झाला.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चार आरोपींना अटक करण्यात आली होती, तर तीन आरोपी फरार होते. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला असून, गेल्या चार दिवसांपासून सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा तपास करत होते.
(Valmik Karad surrenders)
सीआयडीच्या तपासात वाल्मिक कराडचे नाव सतत पुढे येत होते. हत्येनंतर कराडवर मास्टरमाईंड असल्याचा आरोप होऊ लागला. सीआयडीने कराडच्या निकटवर्तीयांची कसून चौकशी करून तपासाचा फास आवळला आणि कराडला शरण येण्यास भाग पाडले. वाल्मिक कराडच्या अटकेनंतर आता पुढील तपासातून अनेक रहस्य उलगडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे ही वाचा :
मोठी बातमी: संतोष देशमुख हत्या प्रकरण ; वाल्मिक कराडची सीआयडीसमोर शरणागती
Mutton bhakari : टण टण वाजलं; झणझणीत मटण भाकरी
बीएसएनएलमध्ये १९,००० कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती, खर्च कपातीसाठी मोठे पाऊल
पुणे मेट्रो फेज 2 मध्ये सात नवीन मार्गांचा समावेश
अभिनेता दिलीप शंकर यांचे निधन, हॉटेलच्या खोलीत आढळला मृतदेह
मोठी बातमी : पुजाऱ्यांना मिळणार दरमहा 18,000 सन्मान निधी
मोठी बातमी : विमानाचा भीषण अपघात, 42 जणांच्या मृत्यूची शक्यता
मोठी बातमी : लाडक्या बहीणींच्या खात्यात आजपासून जमा होणार डिसेंबरचा हप्ता
इयत्ता पाचवी ते आठवी ढकलगाडी अखेर बंद, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय!!
प्रसिद्ध चित्रपटनिर्माते श्याम बेनेगल यांचे ९० व्या वर्षी निधन