Home आंतरराष्ट्रीय Kazakhstan : अजरबैजानच्या विमानाचा भीषण अपघात, 42 जणांच्या मृत्यूची शक्यता

Kazakhstan : अजरबैजानच्या विमानाचा भीषण अपघात, 42 जणांच्या मृत्यूची शक्यता

Breaking

Plane crash in Kazakhstan : कजाकिस्तानमध्ये अजरबैजान एअरलाईन्सच्या प्रवासी विमानाचा भीषण अपघात झाला आहे. या विमानात 67 प्रवासी आणि चालक दलातील 5 सदस्य होते. दुर्घटनेनंतर विमानाने आग पकडली असून आतापर्यंत 42 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कजाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात 25 जणांना वाचवण्यात यश आलं आहे.

अजरबैजानची राजधानी बाकूहून रशियातील चेचन्याच्या ग्रझोनी येथे जाणाऱ्या एम्ब्रेयर 190 या प्रवासी विमानाला कोसळण्यापूर्वी अनेक वेळा चक्कर मारून आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न करताना दिसले. मात्र, अक्ताऊ शहराजवळ विमानाचा ताबा सुटला आणि विमान जमिनीवर कोसळले. विमान कोसळल्यानंतर त्वरित आग लागल्याने मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली.

अपघाताचे दृश्य व्हिडीओतून समोर आले आहे, ज्यामध्ये विमान उंचीवरून झपाट्याने खाली येताना दिसते. यावेळी विमान उजवीकडे झुकून एका मोकळ्या मैदानात कोसळले. दुर्घटनास्थळी तात्काळ मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.

plane crash in Kazakhstan

घटनास्थळी पोहोचलेल्या टीमने विमानाच्या मागील भागातून काही प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र, गंभीर जखमी आणि मृत्यू झालेल्यांची संख्या मोठी असल्याचे समजते. विमानाचे पंजीकरण क्रमांक 4K-AZ65 असून, त्याचा तपशील फ्लाइटरडार24च्या डेटाशी जुळतो.

या दुर्घटनेने जगभरात हळहळ व्यक्त होत आहे. बचावकार्य अद्याप सुरू असून अपघाताच्या कारणांची चौकशी केली जात आहे.

हे ही वाचा :

मोठी बातमी : लाडक्या बहीणींच्या खात्यात आजपासून जमा होणार डिसेंबरचा हप्ता

इयत्ता पाचवी ते आठवी ढकलगाडी अखेर बंद, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय!!

प्रसिद्ध चित्रपटनिर्माते श्याम बेनेगल यांचे ९० व्या वर्षी निधन

प्रेयसीने प्रियकराचा प्राईव्हेट पार्ट कापून केला धडापासून वेगळा, वाचा काय आहे कारण

गायांनी कारचा पाठलाग करत वासराला वाचवलं, पहा भावनिक व्हिडिओ

मुंबईत ठाकरे बंधू एकत्र : राज आणि उद्धव ठाकरे यांची भेट चर्चेला उधान

ब्रेकिंग : पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रन, फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडले

Exit mobile version