Home ताज्या बातम्या Cow Video : गायांनी कारचा पाठलाग करत वासराला वाचवलं, पहा भावनिक व्हिडिओ

Cow Video : गायांनी कारचा पाठलाग करत वासराला वाचवलं, पहा भावनिक व्हिडिओ

छत्तीसगड गायांनी कारचा पाठलाग करत वासराला वाचवलं, पहा भावनिक व्हिडिओ Chhattisgarh cows chase car and rescue calf, watch emotional cow video

Cow Emotional Video : छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. गायांच्या एका झुंडाने आपल्या वासराला वाचवण्यासाठी कारचा पाठलाग करत वासराला वाचवल्याचा भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या घटनेत, गायांनी एका कारचा पाठलाग करून तिला ओव्हरटेक केलं. कारला थांबवल्यानंतर गायी त्या कारभोवती गोल फिरू लागल्या. हा नजारा पाहून आजूबाजूच्या लोकांचे लक्ष गेले. त्यानंतर कारखाली एक वासरू अडकले असल्याचे स्थानिक लोकांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने कार उचलून जखमी वासराला बाहेर काढलं.

Cow Emotional Video

गायांच्या ममत्वाने लोकांची मने जिंकली असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या घटनेने प्राणीमात्रांतील प्रेम आणि माणुसकीचे दर्शन घडवले आहे. (Cow Video)

रायगडमधील ही घटना जनावरांच्या भावनिक नात्याचा आणि एकोप्याचा सुंदर संदेश देत असून, या घटनेने अनेकांना विचार करायला भाग पाडले आहे.

हे ही वाचा :

ब्रेकिंग : शरद पवार यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात

BMC : बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती

RITES लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती, आजच अर्ज करा

ब्रेकिंग : राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना भेट घेणार

मोठी बातमी : राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, वाचा कुणाला कोणते खाते

राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Exit mobile version